लासलगांव – महाराष्ट्र राज्य वाईन्स उद्योगसमूहातर्फे कोरोनाच्या लढ्यासाठी सामाजिक बांधिलकीतुन ५० लाखाचा धनादेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे अखिल भारतीय वाईनरीचे अध्यक्ष जगदीश दादा होळकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दालनात देण्यात आला. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले अखिल भारतीय वायनरी चे सेक्रेटरी तथा सुला वाईनचे संजय पैठणकर, रिवो वाईनचे अश्विन रॉड्रिक उपस्थित होते.