लासलगाव – लासलगाव शहरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता लासलगाव पोलिस कार्यालयाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारून दुचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जे वाहन चालक या पट्ट्याच्या आतमध्ये आपली दुचाकी लावणार नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.
लासलगाव बाजार समितीत दिवसेंदिवस कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढत असल्याने दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अनेक दुचाकीस्वार रस्त्याच्याकडेला आपली दुचाकी उभी करून खरेदीकरिता निघून जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी जादा प्रमाणात होत असल्याने लासलगाव पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सफेद पट्टे मारण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. वाहतूक कोंडी टाळण्याकरिता दुचाकीस्वारांनी आपली वाहने पट्टे मारलेल्या जागी लावण्याचे आवाहन लासलगाव पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
पोलिसांच्या वतीने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाय योजना केली जात असली तरी वाहन चालकांनी नियमांचे पालन करून सांगितलेल्या जागेत दुचाकी लावणे गरजेचे आहे. अन्यथा लासलगाव पोलीस जे दुचाकीस्वार नियम मोडतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती राहुल वाघ यांनी दिली. शहरातील मुख्य दोन्ही रस्त्यांच्या बाजूला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनचे वतीने रस्त्याच्या दोन्ही तर्फा सफेद पट्टे मारण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी सफेद पट्ट्याच्या आतील भागातच वाहन पार्किंग करावी जे नागरिक सफेद पट्ट्याच्या बाहेर गाडी पार्क करतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्या दुकानासमोर वाहन पार्किंग करणार त्या संबंधित दुकानदार यांनीसुद्धा देखील गाडी सफेद पट्ट्याच्या आत पार्किंग होईल याची दक्षता घ्यावी असे आवाहन लासलगाव चे सहाय्यक पोलीस निरिक्षक राहुल वाघ यांनी केले आहे. लासलगाव पोलिसांच्या वतीने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सफेद पट्टे मारण्याची कारवाई सुरू आहे.लासलगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ ,प्रदीप आजगे आणि देवढे दिसत आहेत.