लासलगाव – चांदवड तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील खडक ओझर येथील पीडित विष्णू शंकर पाचोरकर या शेतकऱ्यांची चार एकर शेतजमीन जवळपास दीड दोन कोटींची किंमत असलेली अवघ्या बारा लाखांच्या मोबदल्यातून पिंपळगाव बसवंत येथील सावकाराने घेतलेली जमीन न्यायालयीन लढाईतून पुन्हा ताब्यात मिळाली. या दाव्यात निफाड न्यायालयातील प्रसिद्ध विधिज्ञ अरविंद बडवर यांनी सावकाराच्या विरोधात भक्कम युक्तिवाद केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की विष्णु शंकर पाचोरकर राहणार खडक ओझर तालुका चांदवड यांनी किशोर कुमार श्रीधर दीक्षित राहणार पिंपळगाव बसवंत तालुका निफाड यांच्या कडून दिनांक ६/३/२०१९ रोजी आपल्या खडक ओझर येथील शेतजमीन गट नंबर ७३६ क्षेत्रातील १ हेक्टर ५७ आर जवळपास चार एकर क्षेत्र आपल्या शेत जमीन शेडनेट उभारण्यासाठी १२ लाखाच्या सावकारी ७ रुपये शेकडा दराने कर्जासाठी आपल्या शेतजमिनीचा खरेदीखताचा दस्त लिहून व नोंदवून संबंधित सावकाराने लिहून घेतला. त्या मोबदल्यात सावकाराने पाचोरकर या शेतकऱ्यांच्या कॉर्पोरेशन बँकेचे थकीत कर्ज कॉर्पोरेशन बँक शाखा चांदवड ११ लाख ७५ हजार पाचोरकरच्या कर्ज खात्यात ६/३/२०१९ रोजी भरणा केले. त्यात व्याजाची रक्कम २ लाख ४६ हजार ७५० रुपये अधिक खरेदी खरेदी खर्च मिळून एकूण १५ लाख १० हजार रूपये रकमेची खरेदीखत सावकाराने ६/३/२०१९ रोजी रक्कम ३ लाखाचे चार व ३ लाख १० हजार एक असे एकूण पाच धनादेश पाचोरकर यांच्या नावे देऊन पिंपळगाव मर्चंट ऑफ बँकेत जमा करुन त्याच्या खात्यातून सावकाराने त्यांच्या ताब्यात असलेले पाचोरकर यांच्या धनादेश पुस्तकचा वापर करून दिनांक 12/3/2019, दिनांक 20/3/2019, दिनांक 28/3/2019 रोजी अनुक्रमे रक्कम ६ लाख १० हजार रूपये,६ लाख रूपये, ३ लाख रूपये , काढून घेतले. सावकाराने बेकायदेशीर सावकारी व्यवसायासाठी पाचोरकर यांच्या नावाने धनादेश देऊन पाचोरकर यांच्या नावाने सावकाराने त्यांच्या खात्यावर ती धनादेशा प्रमाणे रक्कम वर्ग करून सावकाराने पाचोरकर यांच्या खात्यावरील रक्कम ताब्यात असलेल्या धनादेश याच्या आधारे सावकाराने एकूण १५ लाख १० हजार स्वतः काढून घेतलेली होती.
त्यामुळे खरेदीखता प्रमाणे पाचोरकर यांना कोणतेही रोख रक्कम मिळालेली नसल्याने व खरेदीखतात सावकार यांना मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा दिल्याचे नमूद केलेले असले तरी मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा हा पाचोरकर कुटुंबाकडे असल्याने 18/6/2021 रोजी महाराष्ट्र सावकारी नियंत्रण कायदा २०१४ चे कलम १७ व १८ प्रमाणे गहाण ठेवलेली स्थावर मिळकत गहाण मुक्त करून खरेदी खत पाचोरकर यांचे लाभात लिहून व नोंदवून द्यावे असा सावकार यांना आदेश मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यात पाचोरकर यांनी जुलै २०१९, सप्टेंबर २०१९ होतो व्याजाची रक्कम २ लाख ४६७५० रूपये संबंधित सावकाराला वेळोवेळी दिली असतानाही ऑक्टोबर २०१९ रोजी पाचोरकर यांनी सावकाराकडे आपल्या रक्कमेचा हिशोब करण्याची विनंती केली. संबंधित सावकाराने ११ लाख ७५ हजार अधिक ८२ हजार दोनशे पन्नास रुपयाची अधिकची मागणी केली. त्यावेळेस पाचोरकर यांनी दीक्षित सावकाराकडे आपल्यावर अन्याय न करण्याची विनंती केली. परंतु ही विनंती धुडकावत पाचोरकर यांना अपमानास्पद वागणूक देऊन बेकायदेशीरपणे तलाठी खडक ओझर यांच्याकडे ६/३/२०१९ खरेदीखताचा दस्त नोंदवून घेतला. महाराष्ट्र सावकारी कायदा नियंत्रण २५, २४ प्रमाणे कारवाई होऊन कलम २१ प्रमाणे संबंधित दीक्षित सावकाराचे लायसन रद्द करण्यात व अर्जाचा संपूर्ण खर्च संबंधित सावकाराकडून मिळावा तसेच सहकार अधिकारी सचिन खैरनार या संबंधित अधिकाऱ्याने २३/७/२०२० रोजी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करत पाचोरकर यांच्या ताब्यात प्रत्यक्ष कब्जा असल्याने संबंधित सावकार जी माहिती देत होता ती खोटी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वस्तुस्थितीचा प्रत्यक्ष पंचनामा करून न्यायालयाने सतीश खरे सावकारांचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सावकारी अधिनियम 2014 कलम 18/ 2 नुसार अधिकाराचा वापर करून पीडित शेतकरी विष्णु शंकर पाचोरकर यांची खडक ओझर येथील शेत जमीन जमिनीवरील सावकारी अंतर्गत खरेदीखत अवैद्य असल्याचे घोषित केली. त्यांची शेत जमीन परत देण्यासाठी तलाठी मंडल अधिकारी दुय्यम निबंधक चांदवड यांना आदेश काढल्याने निफाड न्यायालयातील विधिज्ञ अरविंद बडवर यांनी संबंधित सावकारा विरुद्ध प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पुरावे उपलब्ध करून न्यायालयासमोर पीडित पाचोरकर यांची बाजू लावून धरली. त्यामुळे दडपशाही करणाऱ्या सावकाराचे पाळेमुळे उघड झाले.