लासलगाव – येथे आज सकाळी ८ वाजता क्रिकेट टर्फ ग्राउंड ग्रामपंचायत लासलगाव येथे डॉक्टर्स असोसिएशन तर्फे धन्वंतरी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात सर्वप्रथम ध्यान व योग शिबीर आयोजित करण्यात आले होते. यासाठी योग विद्या प्रचारक श्री प्रदीप जी साळी व डॉ मनोज ठोके यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास निफाड तहसिलच्या प्रांताधिकारी डॉ. सौ अर्चना पठारे म्हणुन उपस्थित झाल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉ मुजम्मिल मणियार यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान धन्वंतरीचे पुजन सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
डॉ रुपेश गांगुर्डे यानी धन्वंतरी स्तवनाचे पठण केले. त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ सौ अर्चना पठारे यांचा लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ श्रीकांत आवारे व कार्यकारिणी सदस्या डॉ रसिका पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला तसेच इतर मान्यवरांचे सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मुजम्मिल मणियार यानी आपल्या मनोगतात सर्वाना दिपावली सणाच्या शुभेच्छा देवुन लासलगाव डॉक्टर्स असोसिएशन च्या विविध शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले ..
प्रमुख अतिथी डॉ अर्चना पठारे यानी आपल्या मनोगतात कोविड काळात लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनने प्रशासनाशी समन्वय साधुन खुप मोलाचे सहकार्य केल्याबद्दल अभिनंदन केले. दैनंदिन धकाधकीच्या युगात डॉक्टर आपली रुग्णसेवा देत असताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे असा सल्ला दिला. तसेच दिवाळी सर्वांना निरामयी जावो अशा शुभेच्छा दिल्या .. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ प्रियंका गायकर यांनी केले.कार्यक्रम सशस्वीतेसाठी डॉ अमोल शेजवळ, डॉ सोनल सोनवणे, डॉ नितीन न्याहारकर, डॉ स्वप्निल जैन ,डॉ रसिका पाटील यानी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी डॉ श्रीनिवास दायमा , डॉ श्रीधर दायमा , डॉ भुपेंद्र पाटील , डॉ किरण निकम ; डॉ सुजित गुंजाळ , डॉ विलास कांगणे ; डॉ . गौरव माठा ,डॉ प्रणव माठा , डॉ अमोल गायकर , डॉ पौरव गांगुर्डे ,डॉ विकास चांदर , डॉ कृष्णा यादव , डॉ अविनाश दुधे , डॉ संजय पलोड , डॉ ईश्वर वाघचौरे , डॉ युवराज पाटील , डॉ सागर घनघाव , डॉ अमित धांडे , डॉ दत्तात्रेय जगताप , डॉ विक्रम होळकर ,डॉ विनोद लोहाडे ,डॉ प्रताप पवार , डॉ जांगडा ,डॉ लाहोटी ,डॉ रायते , डॉ केंगे आदि व महिलावर्गात डॉ संगिता सुरसे , डॉ कल्पना जगताप , डॉ भाग्यश्री सोनवणे , डॉ मनिषा पलोड , डॉ अर्चना लोहाडे ,डॉ उषा बंदछोडे , शैला माठा , डॉ वैशाली पवार , डॉ रोहीणी पाटील , डॉ प्रियंका न्याहारकर ,डॉ ऋता घनघाव आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ अमोल शेजवळ यानी केले .