लासलगाव – सर्व सामान्यांची दिवाळी सुखकर व्हावी म्हणून लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सवलतीच्या दरात ना नफा ना तोटा या तत्वावर दिवाळी फराळ विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. त्याच पद्धतीने प्रतिष्ठानाच्या वतीने “जलतृप्ती” शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याच्या एटीएमचे उद्घघाटन वसंतराव पानगव्हाणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. प्रतिष्ठानाच्या उपक्रमांतर्गत रुग्णवाहिका जनतेला सुपूर्द करण्यात आली.सुरुवातीलाच लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र पाडवी व सौ पाडवी तसेच प्रमोद पवार व सौ.पवार यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी फराळ पुरवठादार भास्कर परदेशी , शंभुशेठ यादव,मोईनभाई,नरेंद्र परदेशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवी दिल्ली नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, लासलगाव शिक्षण सहायक मंडळाचे सचिव संजय पाटील, ॲड.सुभाष देशमुख लासलगावचे उपसरपंच अफजल पठाण, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, निवृत्ती गायकर,सीताराम जगताप, डॉ सुरेश दरेकर, डॉ कैलास पाटील, डॉ अरुण काळे, डॉ विजय केंगे, डॉ युवराज पाटील,देवीदास पाटील, प्रल्हाद पाटील, योगेश पाटील,तुळशीराम जाधव, कैलास ठोंबरे,लक्ष्मण मापारी, प्रकाश गांगुर्डे, राजाराम मेमाणे, विठ्ठलराव गायकर, दिलीप देसाई, प्रदीप माठा, ॲड जाधव, हरिभाऊ होळकर, बाबा आव्हाड , मंजू ठोंबरे, बंडू कुमावत,भानुदास कांगुणे, अरुण शर्मा, रामभाऊ,भरत माळी,सागर शिंदे , दत्तात्रय नवले आदी मान्यवर उपस्थित होते.
गत चौदा वर्षांपासून या प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी फराळाची सुरुची मिठाई या नावाने दिवाळी फराळरुपी पदार्थ सोनपापडी,मोतीचूर लाडू,म्हैसूर पाक, करंजी,नानकटाईआदी गोड पदार्थ 90 रुपये प्रति किलो तर दोन-तीन प्रकारच्या शेव व चिवडा, चकली आदी तिखट पदार्थ केवळ 110रु प्रति किलो,प्रति पाकीट या दराने विक्री केली जाते .या वर्षी सुमारे 80 हजार किलो फराळ पदार्थांची उपलब्धता करण्यात आली असून पुढील चार ते पाच दिवस सकाळी दहा ते सायं सहा वाजे पर्यंत लोकनेते दत्ताजी पाटील स्मारका शेजारी या दिवाळी फराळ पदार्थाची विक्री सुरू राहणार आहे अशी माहिती या वेळी संयोजक नानासाहेब पाटील यांनी दिली,या उपक्रमासाठी अनेक संघटना व हितचिंतकांची मोलाची मदत होत असून परिसरातील सर्व सामान्य शेतकरी व शेतमजूर कामगार आदी मंडळींची फराळ पदार्थ खरेदी साठी झुंबड उडते ती गर्दी टाळुन कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन पदार्थ खरेदी करताना सामाजिक अंतर , सॅनीटायझर तसेच मास्क लावून नागरिक उपस्थित होते. तसेच लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठान व त्यांच्याशी संलग्न लोकनेते दत्ताजी पाटील सह बँक लासलगाव शिक्षण सहायक मंडळ,लासलगाव खरेदी विक्री संघ या संस्थेचे संचालकांचा व कर्मचारी वर्गाचा सक्रिय सहभागातून ही सेवा पार पडते.
दिवाळी ही अल्प रकमेत आनंदात साजरी होते
परिसरात शेतीची विविध कामे जोमाने सुरु असून खरीप हंगामातील पिकांची काढणी व रब्बी हंगामातील पिकांची पेरणी कांदा लागवड या सारख्या अनेक शेतीची कामे सुरू असल्याने महिला शेतकरी व शेत मजूर यांना दिवाळी साजरी करणे जिकरीचे होते,आमच्या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना मोठा दिलासा मिळत असून शेतकरी बंधु व शेतमजुरांची दिवाळी ही अल्प रकमेत आनंदात साजरी होते. यावर्षी शहरात फराळ विक्रीचे अनेक स्टॉल उभे राहिले असून परिसरात उत्तम पाऊसपाणी झाल्यामुळे या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभेल अशाप्रकारचे वातावरण दिसते आहे.
नानासाहेब पाटील, उपक्रमाचे संयोजक