लासलगाव – लासलगाव आगाराच्या लासलगाव ते तुळजापूर या बसगाडीसाठी बस क्रमांक एम एच १४ – ३६४१ ही बस आज सकाळी लासलगाव बस आगारात प्रवेश घेत असताना कंटेनर नंबर एमएचवाय ४७६३ ने धक्का दिल्याने बसचा चालक एस. पी.निकम यांनी खाली उतरून पाहणी करीत अस्ताना कंटेनरने या चालकास फरफटत नेऊन या चालकाचे तुकडे तुकडे करीत ओढून नेले. या दुर्दैवी अपघातात चालक एस. पी.निकम यांना नाहक ऐन दिवाळीच्या सणात आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लासलगावकर सुन्न झाले. संतप्त बसचालक व वाहक तसेच लासलगाव बस आगारातील कर्मचारी संतप्त झाले व बस सेवा बंद पडली.
नाशिक येथून बसचालक एस. पी.निकम हे लासलगाव येथे आले. सकाळी बस स्थानकावर चालक एस. पी.निकम यांनी लासलगाव बस आगाराचे व्यवस्थापक समर्थ शेळके व राजेंद्र दारके यांचेसह चहा घेतला व बस आगारातून बस घेऊन बस स्थानकात रस्त्याने आत घेत असताना बसला केंटरने धक्का दिला व अपघात झाला. हा कंटेनर चालक भरघाव वेगाने बस स्थानक ते गुंजाळ पेट्रोलपंपासमोर असलेल्या अमित नंदकुमार बिरार व सलिमभाई कलरवाले यांचे दुकानांना धडका देत व एका स्कूटी गाडीला धडक देत हा कंटेनर थांबला. या अपघातत चालक निकम यांचे मृतदेहाचा रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. ही घटना समजताच लासलगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे कर्मचारी सह दाखल झाले व चालक निकम यांच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून अंबुलंसमध्ये टाकले व रस्ता पाण्याने धूवून घेतला.
सध्या बस चालक वाहकांच्या संप सुरू होता परंतु काल बससेवा सुरू झाली. आज बस कर्मचारी परत संपाचे मानसिकतेत होते. परंतु दिवाळीमुळे बस सुरू करतात अशी विनंती करण्यात आली. लासलगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व बस आगार प्रमुख समर्थ शेळके यांचेत चर्चा झाली त्यानुसार आज सकाळी सहा वाजेपासून बसेस सुरू झाल्या. व ही दुर्घटना घडली. त्यामुळे संतप्त बस कर्मचारी संतप्त झाले आणि बस कर्मचारी त्यांनी बस सुरू झाल्याबद्दल चालकांनी त्या चालकाच्या अपघाती मृत्यू बद्दल जोरदार टीका केली नंतर लगेच पोलीस निरीक्षक राहुल वाघ सहकाऱ्यांसमवेत दाखल झाले सदर कर्मचारी यांचेशी संवाद साधला. जिल्हा परिषद सदस्य डी.के.जगताप यांनी कर्मचारी यांची भेट घेतली. दरम्यान राज्य परिवहन मंडळ नाशिकचे विभाग प्रभारी नियंत्रक मुकुंद कुवंर, विभागीय अधिकारी कैलास पाटील, सुरक्षा अधिकारी अजित भारती व कामगार अधिकारी शेख या लासलगाव दाखल झाल्या आहेत.