लासलगाव – सध्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर सुरू असतांनाच शासनाचे महाभूमी प्रकल्पाचे समन्वयक रामदास जगताप यांनी तलाठी संघटनेचे पदाधिकारी यांना असंविधानिक शब्द वापरल्याचा तीव्र निषेध करीत त्यांची बदली समन्वयक पदावरून इतरत्र न झाल्यास १३ ऑक्टोबरपासून नैसर्गिक आपत्ती व निवडणूक कामकाज वगळता अन्य सर्व कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
या मागणीसाठी विविध आंदोलने करण्यात येणार असल्याचे निवेदन आज निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांना देण्यात आले. तलाठी संघाचे अध्यक्ष नितीन केदार सरचिटणीस संतोष हिरे यांचे नेतृत्वाखाली आज हे निवेदन देत निषेध व्यक्त केला गेला. या निवेदनात निफाड तालुका तलाठी संघातर्फे म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपती परिस्थितीत युदय पातळीवर पंचनाम्याचे काम चालु असून अशा परिस्थितीत ई पिकपाहणी व मोफत सातबारा वितरणाचे काम चालु आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी सात बारा वितरणाचे काम कशा प्रकारे करावे या बाबत राज्यातील तलाठी यांना एक संदेश व्हाटसअॅपवर केला होता. परंतु हा संदेश वाचुन प्रकल्प अधिकारी रामदास जगताप यांनी मुर्खासारखे संदेश पाठवु नका असे लिहुन DILMP पुणे या ग्रुपवर तलाठी संघाचे राज्य अध्यक्ष यांचा अवमान केला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी या संवर्गाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.जगताप साहेब यांच्या बेजबाबदार व असंवैधानिक वक्तव्याचा निफाड तलाठी संघाने निवेदनात जाहीर निषेध करून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन सादर करून या घटनेचा निषेध करीत विविध आंदोलने सुरू केली असुन ८ ऑक्टोबर रोजी काळया फिती लावून कामकाज करणे
दि .11 रोजी तहसिल कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत निदर्शने करणे. दि .12 ऑक्टोबर रोजीतहसिलदार साहेब यांचेकडेस सर्वाच्य DSC जमा करणे व रामदास जगताप साहेब यांची समन्वयक पदावरून अन्यत्र बदली न झाल्यास दि .13 ऑक्टोबर पासून नैसर्गिक आपत्ती व निवडणूक कामकाज वगळता अन्य सर्व कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात नाशिक जिल्हयातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सहभागी होणार असून संघटनेचे उपाध्यक्ष अभिजित पाटील,सहचिटणीस शंकर खंडागळे , खजिनदार : श्री. निखिल शिरोडे ,सल्लागार एन. वाय. उगले , पुष्कराज कैवारे, सोमनाथ खैरे, संघटक महेश सहदेव गायकवाड, शितल कुटे, सदस्य उल्हास देशमुख,नंदु कुंदे कु . गिता कनोज, विनोद ठाकुर, भाऊसाहेब भोई ,संतोष माळी मोतीराम पाटील, सिमा धारक ,शशिकांत चिताळकर , गजानन डोके, गणेश जगताप, असिफ पठाण, सागर शिर्के, अनिल बावस्कर, दत्ता गोटे, लक्ष्मीकांत शिंदे,. प्रसाद देशमुख आदी उपस्थित होते.