संत सेना चारिटेबल ट्रस्टतर्फे पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन
लासलगाव – सलुन, ब्युटी पार्लर व्यावसायिकांना प्रथम प्राधान्याने कोविड लसीकरण द्यावे या मागणीचे निवेदन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. लासलगाव येथील संत सेना चारिटेबल ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष अरविंद देसाई, सचिव अनिल वाघ, शहराध्यक्ष तुषार जगताप यांनी हे निवेदन दिले आहे.
लॉकडाऊन २०२१ च्या एप्रिल ते मे या कालावधीत शासकीय नियमांच्या अधीन राहून व शासनाच्या सूचनेप्रमाणे सर्व सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहे. लॉकडाऊन शितील होण्यापूर्वी किंवा शासनाने व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यापूर्वी विसरून व ब्युटी पार्लर चालविणाऱ्या कारागीर व त्यांच्या कुटुंबास प्रथम प्राधान्य देऊन कोविड १९ लसीकरण प्रथम प्राधान्य करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच नाभिक समाजाचे सलुन, ब्युटी पार्लर व्यवसायिकांची कोरोना टेस्ट करण्यासाठी स्वतंत्र शिबिर घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून या मागणीचे निवेदन येवला येथील नाभिक समाजाचे कार्यकर्ते सचिन सोनवणे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले. या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, निफाडच्या प्रांत तहसीलदार यांना सादर करण्यात आल्या आहेत.