लासलगाव – श्री संत सेना चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने समाजतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम अनुकरणीय असून लासलगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सभामंडचे उर्वरित कामाकरीता आमदार नरेंद्र दराडे यांचे निधीतून सुमारे दहा लाख रूपयांचा निधी उपलब्ध होण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करू असे प्रतिपादन येवला येथील युवा नेते कृणालभाऊ दराडे यांनी केले. आज श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमीत्त गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात अशोकनाना होळकर लासलगावचे सरपंच जयदत्तजी होळकर, जि.प.सदस्य डी.के.जगताप,पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे ,नाशिक मर्चटस बॅकेचे संचालक प्रकाश दायमा, डॅा. विलास कांगणे, लासलगाव डॅाक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॅा. विजय केंगे, ठाकुर साहेब, नामदेव दरेकर, ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद देसाई उपस्थित होते. याप्रसंगी कृणाल दराडे बोलत होते.
लासलगाव येथे नाभिक समाज च्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी साजरा करण्यात आली प्रसंगी नाभिक समाज बांधव कोरोना प्रादुर्भावामुळे सॅनेटराईज , सोशल डिस्टन्सचा वापर करीत श्री संत संत सेना महाराज प्रतिमा पुजन युवा नेता कृणाल दराडे, अशोकनाना होळकर, लासलगावचे सरपंच जयदत्तजी होळकर, जि.प.सदस्य डी.के.जगताप,पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे , लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ सचिव संजय पाटील, नाशिक मर्चटस बॅकेचे संचालक प्रकाश दायमा, डॅा. विलास कांगणे, लासलगाव डॅाक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॅा. विजय केंगे, ठाकुर साहेब, नामदेव दरेकर यांचे हस्ते करण्यात आले. लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी लासलगाव येथे नाभिक समाजबांधवानी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कामास प्रारंभ केलेनंतर विविध समाजोपयोगी कार्यक्रमाबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांन् प्रोत्साहीत करण्यासाठी सत्कार कार्यक्रम आयोजीत केला त्याबद्दल भाषणात कौतुक केले.
नाशिक मर्चटस बॅकेचे संचालक प्रकाश दायमा यांनी नाभिक समाजाने जी एकजुट दाखवित काम केले त्याबद्दल प्रशंसोदगार काढुन नामको बॅकेच्या वतीने नाभिक समाजबांधवाना विनातारण सुमारे दोन लाख कर्ज मिळवून देण्यासाठी आपण लक्ष घालु असे सांगितले. पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांनी नाभिक समाजाने मंदिराबरोबरोच अभ्यासिका व दिंडी घेऊन जाणारे बांधवाकरीता निवासाची सुविधा केली त्याबद्दल समाधान व्यक्त करून आमदार नरेंद्र दराडे यांचे विकास निधीतुन कामास आर्थिक मदत करण्याची विनंती केली.
श्री संत सेना मंदिर कामाचा आढावा आपल्या प्रास्ताविकात अनिल वाघ यांनी घेत उर्वरित कामास आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी कुमारी धनीषा देसाई यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे वतिने सत्काराबद्दल आभार मानले. कुमारी शिवानी मोटेगावकर हीने सुत्रसंचालन केले तर आभार नितीन वाघ यांनी मानले. मंदिरास ध्वनिक्षेपक व्यवस्था दिल्याबद्दल नामदेव दरेकर यांचा तर पखवाज व भजध साहित्य दिल्याबद्दल गंगाराम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी सकाळी भजन कार्यक्रम संपन्न झाला. करण्यात आला व महापूजा करण्यात आली त्यानंतर संत सेना महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर महाआरती करण्यात आली व महाप्रसाद सर्व समाज बांधवांना देण्यात आला कार्यक्रम सुंदर अशा स्वरूपात सर्व समाज बांधवांनी साजरा केला श्री संत सेना पुण्यतिथी कार्यक्रम साजरा होण्यासाठी श्री संत सेना चॅरिटेबल ट्रस्ट सर्व विश्वस्त बांधकाम समितीचे सर्व सदस्य श्री संत सेना महिला नाभिक सखी मंच लासलगाव नाभिक शहर युनियन यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला