अभियानाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवा- संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी
लासलगाव- शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या संपर्क अभियानाचा शुभारंभ येवला-लासलगाव मतदारसंघात निफाड पूर्व तालूक्यात खडकमाळेगाव, लासलगाव, विंचूर, डोंगरगाव(भरवस) ,देवगाव खेडलेझुंगे या ठिकाणी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख सुनिलजी पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, माजी आमदार कल्याणराव पाटील ,युवासेना महाराष्ट्र विस्तारक कुणाल दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सांगीतले की, सदर अभियानाच्या माध्यमातून शाखाप्रमुख, बुथप्रमूख यांनी लोकांच्या घरा घरात जाऊन मुख्यमंत्री यांनी सर्व सामांन्यांसाठी आणलेल्या योजना लोकांपर्यंत पाहोचवा व त्यांचे प्रलंबीत असलेले प्रश्न सोडवावे. तसेच जिल्हा प्रमुख सुनिल पाटील यांनी सांगीतले की, शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणावर शिवसेना आजही टिकून आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी सांगीतले की, शिवसेनेच्या माध्यमातून माझ्याकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद आले आहे. तरीदेखील शासनाच्या विविध प्रकारच्या योजना सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी मी कटीबध्द राहील. जिल्हातील नागरिकांसाठी तसेच आमदार कल्याणराव पाटील यांनी सांगीतले की युवासेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक युवासेनेत जोडा. महाराष्ट्र विस्तारक कुणालजी दराडे यांनी सांगीतले की, शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून युवासेनेचे पदाधीकारी काम करतील. तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी शिवसंपर्क अभियाना बाबद सविस्तर माहीती देउन अभियान यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांना प्रोत्साहीत केले.
या दौर्यामध्ये उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जगताप,जिल्हा संघटक बाळासाहेब जगताप,जिल्हा समन्वयक राजेंद्र दरेकर ,पं.स. सदस्य शिवा सुराशे तालुका सम्नवयक विकास रायते,प्रविण नाईक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास शिंदे ,माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार तालूका उपप्रमुख फिरोज भाई मोमीन शिवाजी जाधव, शहर प्रमुख नानासाहेब जेऊघाले ,प्रमोद पाटील गटप्रमुख प्रवीण सालगुडे विलास वाघ,गट संघटक बाळासाहेब शिरसाठ,बापुसाहेब शोदक,निवृत्ती खुळे गणप्रमुख उत्तम वाघ,निलेश दरेकर,गोविंद बडवर,युवासेना उपजिल्हा प्रमुख रविराज शिंदे, युवासेना तालुका प्रमुख सौरव तास्कर, शहर प्रमुख दत्ता पाटील,प्रमोद गायकवाड,युवासेना उपतालूका प्रमुख अक्षय निकम,किरण शिंदे ,सनि बोचरे,गट प्रमुख रोहीत जगताप,सागर वाळुंज,किशोर दरेकर,हर्षल काळे,भैय्या भंडारी,ज्ञानेश्वर तासकर,गणेश इंगळे,संदिप उगले,राजेंद्र कराड,केशवराव जाधव,माधव शिंदे,ज्ञानेश्वर भडांगे,सद्दाम शेख,बद्रिनाथ लोहारकर,अशोक भोसले ,सागर सोमासे,गणेश मडके,साईनाथ मुदगूल, बाळसाहेब साबळे, सचिन जाधव, अशोक भोसले, तुकाराम रायते, ईश्वर शिंदे, अविनाश देसाई, सचिन जोशी, जितेंद्र फापाळे पप्पूशेठ पंजाबी, संतोष बोराडे,बापू कुशारे नवनाथ श्रीवास्तव यांसह शाखाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.