लासलगाव – सराईत मोटार सायकल चोरीची टोळी लासलगाव पोलीसांनी गजाआड केली आहे. या टोळीने लासलगाव पोलीस स्टेशन हददतीतुन ३ मोटार सायकल तर येवला तालुका पोलीस स्टेशन हददीतुन १ मोटार साकयल चोरी केली असल्याबाबत कबूली दिली आहे. सदर आरोपी यांचेकडून पोलीस स्टेशन हददतीतून इतर मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. आरोपीस न्यायालयाने २६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. लासलगाव पोलीस स्टेशनला फिर्यादी सुभाष गुजर रा विचुर ता निफाड जि नाशिक यांचे फिर्यादीवरून ६६०/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे मोटार सायकल चोरीचा अज्ञात आरोपीताविरुध्द गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे हे करीत होते. सदर गुन्हयाचा गुप्तबातमी मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रामकष्ण सोनवणे, अजिनाथ कोठाळे, पोना राजे घुगे, पोना योगेश शिंदे, पोना कैलास महाजन, पोकाँ प्रदिप आजगे, कैलास मानकर, देविदास पानसरे, भाऊराव कोते यांचे पथक तयार करून सदर पथकाने विष्णुगनगर पाबळवाडी येथील संशीयत सोमनाथ धोंडीराम हगवणे वय २६ वर्षे व गणेश बाळू गवळी वय २३ वर्षे रा विंचुर ता निफाड यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचा साथीदार संजय ऊर्फ बाळा छबु पवार वय २६ वर्षे रा निमगाव वाकडा ता निफाड याचे मदतीने या मोटारसायकल चोरल्याची कबूली दिली..