लासलगाव – औरंगाबादहून नाशिक येथे मुलीकडे येण्यासाठी एसटी बसने प्रवास करताना येवला येथे एका महिलेचे एक तोळ्याची सोन्याची पोत, ५ ग्रँमची अंगठी व इतर सामान असलेली पिशवी बसमध्येच राहुन गेल्याने कर्तव्यार्थ असलेले वाहक जी. डी. साळवे व चालक ए. आर. शिंदे यांच्या प्रामाणिकपणामुळे प्रवाशी महिलेस परत मिळाल्याने सदर महिलेच्या आनंदाला पारावार उरला नाही.
सविस्तर माहिती अशी की, .१९ जुलै रोजी लासलगाव आगाराच्या MH 14 BT 9327 या बसने औरंगाबाद ते नाशिक गाडीने श्रीम. कमल कडुबा जगदाळे (वय ८०) या नाशिक येथे मुलीकडे येण्यासाठी प्रवास करत असताना येवला बसस्थानकावर लघुशंकेसाठी चालक – वाहकाला न सांगताच उतरल्या व अनावधानाने बस बदली झाल्याने त्यांचे सोन्याची पोत, अंगठी व सामानाची पिशवी बसमध्येच राहुन गेली. सदर बाब लासलगाव आगाराचे चालक अण्णा रामा शिंदे व वाहक गुलाब दत्तराव शिंदे यांच्या लक्षात आल्याने व सदर पिशवी दिसुन आल्याने चौकशी केली. परंतु काही प्रतिसाद न मिळाल्याने ती पिशवी लासलगाव आगारात जमा करुन सदर प्रवाशी महिलेस दागिने परत करुन आपल्या प्रामाणिकतेचे दर्शन घडविल्याने सर्व स्तरातुन त्यांचे कौतुन होत आहे. अतिशय तुटपुंज्या पगारामध्ये काम करणा-या एसटी कर्मचा-यांचे प्रामाणिकपणाचे अनेक उदाहरण आजतागायत ऐकायला मिळत आहे, कोणतीही लालसा मनात न ठेवता काम हिच सेवा, व प्रवाशी हेच दैवत मानुन सेवा बजावत आहेत. वाहक जी. डी. साळवे व चालक ए. आर. शिंदे यांचे आगार व्यवस्थापक एस एन शेळके, वाहतुक नियंत्रक ए. बी. उखार्डे, एन. एल. बोठे, वाय. आर. क्षिरसागर, एस. टी. कदम, बी. के. वाकचौरे, एस. के. तडवी आदिंनी कौतुक केले.