सोळा गाव पाणीपुरवठा योजनेला लागलेली गळती थांबवण्यासाठी भुजबळ यांचेकडे साकडे
लासलगाव – लासलगावसह सोळा गाव पाणी योजनचे जीर्ण पाईप बदलले जाणार असल्याने पाणी पुरवठा ४-५ दिवस बंद होणार आहे अशी माहीती लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली आहे.
टाकळी विंचूरसह १६ गावांना पाणीपुरवठा करणारी सोळागाव पाणीयोजना नादुरुस्त झाल्याने गेल्या वीस दिवसांपासून गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. १६ गाव पाणी योजना ही अत्यंत जुनी झाल्याने यामध्ये लावलेले पाईप जीर्ण झालेले आहे त्यामुळे वारंवार पाईपलाईन फुटणे, लिकेज होणे, मोटारी जळणे अशा अनेक कारणांमुळे पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे.यासाठी पं स सदस्य शिवा पाटिल सुरासे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. या वेळी ना भुजबळ यांनी या कामासाठी निधीची तरतूद केलेली असून लवकरच या कामाला सुरुवात करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
दरम्यान,लासलगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी आज सकाळी लासलगाव येथील नागरिकांना गाजरवाडी दिंडोरी येथे पाईप लाईन मोठया प्रमाणावर फुटलेली आहे.१६ गांव पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन ही नदीतुन गेलेली आहे. नदीमध्ये असलेले पाईप हे पुणपणे जिर्ण झालेले असुन पावसाळयात नदीला पाणी आल्यानंतर पाईप लाईन लिकेज काम करता येणार नाही. त्यामुळे नदीमध्ये असलेले काही पाईप बदलण्याचे काम चालु आहे.त्यामुळे पाईप लाईप बदलणे कामे ४ ते ५ दिवस लागणे अपेक्षित आहे तोपर्यंत गावात पाणीपुरवठा हा बंद राहिल अशी माहीती देऊन पाणी टंचाई कालावधीत लासलगाव ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
विंचूर ते नांदूर मध्यमेश्वर पर्यंत सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली असता बऱ्याच ठिकाणी लीकेज मोठ्या प्रमाणात आढळले . त्यामुळे गेल्या पंधरा वीस दिवसापासून टाकळी विंचूर येथे पाणीपुरवठा बंद आहे . आणि सातत्याने पंधरा पंधरा दिवस पाणीपुरवठा होत नाही त्यात मोठा खर्च व लाईट बिल भरणेकामी सोळा गाव समितीकडे तरतूद नाही . अशा एक ना अनेक समस्यांनी सदरची पाईप लाईन अडकली असून यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यासाठी पं स सदस्य शिवा पाटील सुरासे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना भेटून या पाणीयोजनेचा दुरुस्ती कामी शासन स्तरावरून विशेष तरतूद करावी व या १६ गावाची पाणीपुरवठा सुरळीत करावी अशी विनंती केली आहे.