लासलगाव – भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त आघाडीच्या नाशिक युवा जिल्हाध्यक्षपदी लासलगाव येथील गणेश फड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आ. नरेंद्र पवार ,नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर , खासदार सौ.भारती ताई पवार , नाशिक जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. सुनील बच्छाव सर,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष .सचिन दराडे तसेच उत्तर महाराष्ट्र भ.वि.आ. संयोजक नवनाथ ढगे, सहसंयोजक संपतराव नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली भटके विमुक्त आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्र गांगोले यांनी भटके विमुक्त आघाडीच्या नाशिक युवा जिल्हाध्यक्ष पदी गणेश फड लासलगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्ष वाढीसाठी आवश्यक असे मार्गदर्शन नवनाथ ढगे यांनी यावेळी केले. तसेच संपतराव नागरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी गणेश फड यांना रविंद्र गांगोले यांनी पत्र पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच भटके विमुक्त आघाडी चे जिल्हा सरचिणीस .संजय चांदे यांनी आभार मानले व कौतुक केले.
या प्रसंगी नवनाथ ढगे, संपतराव नागरे, संजय चांदे, महीला जिल्हाध्यक्षा – सौ मिना ताई बिडगर , सौ विद्याताई गोसावी, अनिल भडांगे, नाशिक जिल्हा भटके विमुक्त आघाडीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी नवनाथ ढगे, संपतराव नागरे, संजय चांदे, महीला जिल्हाध्यक्षा – सौ मिना ताई बिडगर , सौ विद्याताई गोषावी, अनिल भडांगे, नाशिक जील्हा भटके विमुक्त आघाडीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.