लासलगाव – पाॅझीटीव्ह रूग्णांवर संपुर्ण नाशिक जिल्ह्यात कोरोना कोविड उपचार केंद्रात रूग्ण बरे करण्यात नावलौकिक कमावलेल्या लासलगाव येथील कोरोना कोविड उपचार केंद्राचे तब्बल चार डाॅक्टर कोरोना बाधीत असल्याने रात्री केवळ एकच डाॅक्टर उपलब्ध असल्याने लासलगाव येथील कोरोना कोविड उपचार केंद्रच रूग्णशय्येवरच आहे.
तसेच ऑक्सीजनची व रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठी समस्या निर्माण झाली आहे.लासलगाव येथील कोरोना कोविड उपचार केंद्रात सध्या पस्तीस कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु एकापाठोपाठ तब्बल चार वैद्यकीय अधिकारी कोरोना पाॅझिटीव्ह असल्याने लासलगाव येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे पर्यायी तरी आरोग्य अधिकारी व कर्मचारी प्रतिनियुक्तीवर पाठवण्याची नितांत गरज आहे. आतापर्यंत १४५ रूग्णावर तर मागील वर्षी कोरोना काळात सहाशे कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना बरे करून घरी पाठविण्यात आले आहे.