लासलगांव बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी दिली माहिती
….
लासलगांव – कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लासलगांव कृषी बाजार समितीत स्मार्ट हेल्मेट मास स्क्रिनींग करण्यात आल्याची माहिती लासलगांव बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी दिली.
कोव्हीड-19 संदर्भात शासनाने ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन करून लासलगांव बाजार समितीमध्ये २४ मे २०२१ पासुन शेतीमाल लिलावाचे कामकाज सुरू झालेले आहे. त्यामुळे लासलगांव बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांवर दररोज शेतकरी बांधवांसह प्रत्येक मार्केट घटकांची प्रवेशद्वारावरच ऑक्सिजन व तापमान तपासणी तसेच रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने अखिल भारतीय जैन संघटना, दि लासलगांव मर्चन्टस् असोसिएशन व कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगांव यांचे संयुक्त विद्यमाने बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर शेतीमाल विक्रीस आलेल्या शेतकरी बांधवांसह, अडते, व्यापारी, कांदा भरणार हमाल, मदतनीस, लिलाव पुकारणार व बाजार समितीचे कर्मचारी अशा एकुण २००० व्यक्तींचे स्मार्ट हेल्मेट मास स्क्रिनींगद्वारे शरीरातील तापमान तपासण्यात आले. सदर तपासणीत जास्त तापमान आढळुन आलेल्या २२ व्यक्तींची रॅपीड ॲन्टीजेन तपासणी केली असता त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे.
सदर स्मार्ट हेल्मेट मास स्क्रिनींगद्वारे एका मिनीटाला सुमारे १५० व्यक्तींचे स्क्रिनींग केले जाते. या मशीनमुळे गर्दीच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर ताप असेल तर ताबडतोब अशी व्यक्ती बाजुला काढुन त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट करण्यात येते आणि जर ती व्यक्ती कोरोना पॉझीटिव्ह आल्यास तिच्यावर वेळीच औषधोपचार केले जातात. त्यामुळे बाजार आवारावर कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण तपासणी करणे सोपे झाले आहे अशी माहिती सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी दिली.
सदर तपासणीचे वेळी बाजार समितीचे सदस्य नंदकुमार डागा, सचिव नरेंद्र वाढवणे, भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, राज्य उपाध्यक्ष दिपक चोपडा, नाशिक शहराध्यक्ष व लासलगांव प्रकल्प प्रमुख अभय ब्रम्हेचा, लासलगांव जैन श्रावक संघाचे संघपती नितीनकुमार जैन व सचिव मनोज शिंगी, लासलगांव ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांचेसह कांदा व्यापारी ओमप्रकाश राका, मनोज जैन, बाळासाहेब दराडे, प्रविण कदम, प्रफुल्लकुमार भंडारी, संतोष माठा, राहुल बरडीया, सुरेश खुर्दे, संदीप गोमासे, मनिष सारस्वत, शंकर काळे, भास्कर डोखळे, नाना कोकणे, बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, लेखापाल सुशिल वाढवणे, सुनिल डचके, दत्तात्रय होळकर, संदीप निकम, मनोज शेजवळ, गौरव निकम, वैभव वाघचौरे, गोरख विसे, रामदास गायकवाड, गणेश आहेर, सचिन वाघ आणि शेतकरी, व्यापारी मदतनीस व कामगार वर्ग उपस्थित होते.
यावेळी दी लासलगांव मर्चन्टस् असोसिएशनतर्फे जास्त कांदा खरेदी करणारे खरेदीदार, बाजार समितीचे सेवक, लिलाव पुकारणार, व्यापारी मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला.