लासलगाव – चैतन्यमय वातावरणात रविवारी ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा लासलगाव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच जयदत्त होळकर, उपसरपंच अफजल भाई शेख तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देत गुढी पूजन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी लासलगाव ग्रामपंचायत सरपंच जयदत्त होळकर, उपसरपंच अफजल भाई शेख व सदस्य शेखर होळकर, संतोष पलोड, रामनाथ शेजवळ, अमोल थोरे, रोहित पाटील, सदस्या सुवर्णा जगताप, संगीता पाटील,ज्योती निकम, अश्विनी बर्डे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, गोकुळ पाटील नाना बनसोडे, संदीप उगले तसेच ग्रामपंचायत कर्मचारी प्रफुल्ल कुलकर्णी, विलासराव खैरनार,बापू सोनवणे किरण गुरव, बाबा गीते , पवन सानप , रुपेश पवार, मंगेश अहिरे, मयूर राऊत, रोशन गायकर , मोगल विस्ते, रीना गायकवाड, लता भंडारी आदी उपस्थित होते.