लासलगाव – नाफेडच्या वतीने नोडल एजन्सी म्हणून विंचुर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्था व लासलगावच्या व्हेफको संस्थेला परवानगी देण्यात आली आहे. आज लासलगाव बाजार समितीत झालेल्या बैठकीत सभापती सौ सुवर्णा जगताप ,संचालक रमेश पालवे,सचिव नरेंद्र वाढवणे, व्यापारी वर्गाचे वतीने नंदकुमार डागा,नितीन जैन, मनोज रेदासणी, बाळासाहेब दराडे, हेमंत राका, विवेक चोथाणी व प्रविण कदम उपस्थित होते.
आज सकाळी २७००० क्विंटल कांदा आवक झाली असून ७०० ते २१९१ व सरासरी १९२५ रूपये बाजारभाव जाहीर झाले. लासलगाव येथील नाफेडचे वतीने एजन्सी म्हणून विंचुर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने श्रीमती साधना जाधव यांनी लावलेल्या खरेदीच्या बोलीनंतर बंद पडलेले कांदा लिलाव दुपारी परत सुरू झाले. गुरूवारी सकाळी लासलगाव बाजार समिती १०५७ वाहनातील कांद्याचा लिलाव झालेले असतानांच नाफेडच्या वतीने एजन्सी नेमलेल्या कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने श्रीमती साधना जाधव यांनी दोन ट्रॅक्टर्स नाफेड करिता कांदा खरेदीची बोली केल्यानंतर लासलगाव येथील लिलावातून व्यापाऱ्यांनी लिलावातून निघून जाणे पसंत केले. त्यामुळे लासलगाव त्यामुळे लासलगाव बाजार समिती लिलाव बंद पडले. संतप्त शेतकऱ्यांनी त्यानंतर व्यापारी आणि लासलगाव बाजार समिती प्रशासनावर तीव्र टीका केली होती.