लासलगाव – लासलगाव येथील नाफेडचे वतीने एजन्सी म्हणून विंचुर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने श्रीमती साधना जाधव यांनी लावलेल्या खरेदीच्या बोलीनंतर बंद पडलेले कांदा लिलाव आज दुपारी बाजार समितीत सभापती सौ सुवर्णा जगताप यांचेसह संचालक व व्यापारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये नाफेडच्या वतीने नोडल एजन्सीचे कागदपत्रे पडताळणी नंतरच बाजार समितीत कांदा खरेदीच्या सुचना देण्यात आल्या आहेत अशी माहीती सभापती सौ सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.
आज सकाळी लिलावाचे कामकाज बंद झाल्यावर दुपारी एक वाजता सभापती सौ सुवर्णा जगताप यांचे अध्यक्षेतखाली संपन्न झालेल्या बैठकीत संचालक शिवनाथ जाधव, ललित दरेकर सचिव नरेंद्र वाढवणे, व्यापारी वर्गाचे वतीने नंदकुमार डागा, नितीन जैन, ओमप्रकाश राका, प्रविण कदम, बाळासाहेब दराडे, विवेक चोथाणी, मनोज जैन , राजेंद्र मुनोत, अफजलभाई शेख, उपस्थित होते. बैठकीत व्हेफको संस्थेचे शरद होळकर व कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने श्रीमती साधना जाधव यांनी आपणास नाफेडने संस्थेला कांदा खरेदीकरीता नाफेडने नोडल एजन्सी नेमल्याचा दावा केला.असता दोन्ही संस्था प्रतिनिधी यांना अधिकृत एजन्सीचे कागदपत्रे सादर केल्यानंतरच पडताळणी होऊन नाफेडचे वतीने कांदा खरेदी करू देण्यात येणार आहे. असा निर्णय झाला. त्यानंतर कांदा लिलाव पुर्ववत सुरू झाले.
आज सकाळी लासलगाव बाजार समिती १०५७ वाहनातील कांद्याचा लिलाव झालेले असतानांच नाफेडच्या वतीने एजन्सी नेमलेल्या कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने श्रीमती साधना जाधव यांनी दोन ट्रॅक्टर्स नाफेड करिता कांदा खरेदीची बोली केल्यानंतर लासलगाव येथील लिलावातून व्यापाऱ्यांनी लिलावातून निघून जाणे पसंत केले. त्यामुळे लासलगाव त्यामुळे लासलगाव बाजार समिती लिलाव बंद पडले. संतप्त शेतकऱ्यांनी त्यानंतर व्यापारी आणि लासलगाव बाजार समिती प्रशासनावर तीव्र टीका केली.
आज सकाळी १०५७ वाहनातील कांदा लिलाव ८०० ते २१७० व सरासरी १८१५ असे भाव जाहीर झाले. ११.२५ मिनीटांनी लिलाव बंद झाल्यानंतर साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमन श्रीमती साधना जाधव यांनी आपणास कांदा खरेदीची नोडल एजन्सीचा अधिकृत परवाना दिला. तसेच बाजार समितीचे अनुज्ञप्तीचे परवाना आहे.आपण सहकारी संस्थेच्या वतीने आपण लिलावात बोली लावल्यास नाफेडची खरेदी केल्यास बाजार भाव वाढतील या भीतीने लिलाव सोडून जाणे गैर असुन कांदा उत्पादकांना स्पर्धात्मक व्यापारी लिलावात न येता मनमानीपणे मनमानीपणे कांदा भाव कमी जाहीर करण्याच्या षडयंत्राचा प्रकार असून आपण याचा तीव्र निषेध करीत आहोत असे त्यांनी सांगितले. शासनाने व प्रशासनाने सहकारी संस्थेचे म्हणून आपणास अधिकृत नाफेड करिता कांदा खरेदीची दिलेली आहे व लासलगाव बाजार समितीने व प्रशासनाने लिलाव बंद केल्याने कठोर कारवाई करण्याची गरज आहे असे साधना जाधव सांगितले
नाफेडच्या वतीने लासलगाव कांदा खरेदी करण्यासाठी एजन्सी नेमलेल्या कृषी साधना शेतमाल उत्पादक सहकारी संस्था विंचूर यांच्याकडून कांदा खरेदी सुरु करण्यास व्यापारी वर्गाचे वतीने लिलावात खरेदी करण्यासाठी बुधवारीही विरोध झाल्याचे समजते. केद्र शासन कांदा महागला तर देशातील नागरिकांना योग्य भावात उपलब्ध करून देता यावा या उद्देशाने कांदा स्थिराकरण निधी अंतर्गत ही खरेदी गेल्या पाच सहा वर्षापासून केली जात आहे.
कृषी साधना शेतमाल उत्पादक सहकारी संस्थेस लासलगाव येथील व्यापारी अनुज्ञप्ती आहे तरीही हा विरोध झाल्याने कांदा उत्पादक संतप्त झाले. यापूर्वी नाफेडचे वतीने लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघाला एजन्सी होती.ती आता विंचुर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेला मिळाली आहे. साधनाताई जाधव यांच्या संस्थेला नोडल एजन्सी मिळाली आहे.त्यामुळे लासलगाव कांदा खरेदी केंद्रातील नमुद आवारावर यावर्षी नाफेडची खरेदी या एजन्सीमार्फत होणार आहे.
यानंतर कृषी साधना शेतमाल उत्पादक सहकारी संस्था विंचूर यांच्याकडून लासलगाव येथे आज सकाळी नाफेडची कांदा खरेदी सुरु करण्याबाबत सभापती सौ सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांचेशी चर्चा केली.नाफेडने कांदा खरेदी सुरू केली तर लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत तीव्र स्पर्धा होऊन कांदा भावाची पातळी वाढते असा अनुभव कांदा उत्पादकांचा आहे