लासलगाव – विंचूर व परिसरात रविवारी दोन वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसाने विंचूर उपबाजार समितीच्या व्यापार्यांचे नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत असलेले कांद्यांचे दहा शेड जमीनदोस्त होवुन कांदा भीजल्याने व्यापार्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले.
सलग दोन दिवसापासून होत असलेल्या वादळी पावसाने शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार असला तरी येथील कांदा व्यापार्यांचे कांदा शेडचे नुकसान झाल्याने व्यापारी वर्गावर अर्थिक संकट ओढावलेले आहे.
वादळी पावसाने नुकसान झालेले व्यापारी पुढील प्रमाणे गजानन ट्रेडिंग चे दोन शेड,राजेश्री ट्रेडिंग , कदम अँड सन्स , आयजा ट्रेडिंग, कृष्णा ट्रेडिंग, आर.टी ट्रेडिंग,मेडोना एक्सपोर्ट ,हरिओम टेडर्स शेडचे नुकसान झाले.
तीन मेंढ्यांचा मृत्यू
पाऊस आल्याने राजेश्री ट्रेडिंग या कांद्याच्या शेड खाली मेंड्या आश्रयाला थांबलेल्या होत्या.त्यावेळी वादळाने शेड पडल्याने शेड खाली दाबून तीन मेंड्यांचा मृत्यू झाला.