लासलगांव – कोणत्याही प्रकारची माहीती न होऊ देता आपले घरातील महिलांसह स्वता योगदान देत कोरोना रूग्णांची प्रकृती बरी व्हावी या हेतुने गेली काही दिवस अहोरात्र कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण व त्यांचे बरोबर असलेले नातेवाईकांना दोन वेळचे गरमागम सकस घरगुती जेवण देण्याची अनोखी समाजसेवा लासलगाव येथील चोथाणी परीवार व त्यांचे मित्र परीवार करीत आहे. संपूर्ण देशात कोरोना विश्व महामारीने हाहाकार माजविला असताना लासलगाव येथील चोथानी परिवार आणि मित्र मंडळाकडून कोरोना रुग्णांची दोन वेळच्या जेवणाची विनामूल्य व्यवस्था गेल्या एक ते दीड महिन्यापासून सुरू केल्याने या उपक्रमाचं जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण कुटुंब व्यवस्था हादरून गेली असताना हॉस्पिटलला दाखल झालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सकस जेवण येथील चोथानी परिवार आणि मित्र मंडळी उपलब्ध करून देत आहे. लासलगाव येथील लोटस हॉस्पिटल ,कृष्णाई हॉस्पिटल व लासलगाव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यातील मुख्य हॉस्पिटलला रोज दोन वेळचे ७० ते ८० जेवणाचे डबे या उपक्रमातून पुरवले जात आहे, वरण ,भात, पोळी ,भाजी खिचडी ,सलाड , ताक,चटणी,कांदा,लिंबू व्यवस्थित पॅक करून रुग्णांना दोन वेळचे गरम जेवण पुरविली जाते. आजपर्यंत दोन ते अडीच हजार परिसरातील रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
विंचूर रोड वरील चोथानी यांच्या कांद्याच्या खळ्यात बनवण्याची व्यवस्था केली आहे, याठिकाणी स्वयंस्फूर्तीने मदत कार्य केले जात असून गेल्या दीड महिन्यापासून चोथानी कुटुंब दिवस-रात्र त्यांच्या मित्रपरिवारासह राबतांना दिसत आहे, विशेष म्हणजे या परिवाराने कोरोनाच्या पहिल्या लाटेत परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पोचवण्याचे तसेच त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली होती, कोणताही आर्थिक मोबदला न घेता स्वखर्चाने वेगवेगळ्या राज्यात या कामगारांना पोहोचवण्यात आले होते,
विशेष म्हणजे हे कार्य चालू असताना परिसरात कोणत्याही मुक्या जनावरांना अपघात की व्याधी झालेली असल्यास या ग्रुप कडून गो सेवा केली जात आहे. या उपक्रमासाठी पुरुषोत्तम चोथानी, प्रतीक्षा चोथानी ,ओम चोथानी ,प्रतिक्षा चोथानी , गायत्री चोथानी,प्रतिक चोथानी, भगवती राणा, शामलता ऊपाध्ये, विशाल पालवे, सुरज नाईक, अजिंक्य खांगळ, अभिजित जाधव, सुरज आबड, त्र्यंबक ऊपाध्ये, सागर चोथानी, प्रियंका चोथानी, समिर गुंजाळ, अमित वर्मा, प्रमोद खाटेकर, सपना चोथानी, कृष्णा चोथानी, यांच्या सह अनेक प्रेमी या ऊपक्रमात सहभागी आहे.
….
मित्र परिवाराच्या मदतीने कार्य सुरु
विश्वव्यापी कोरोना संकटामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहे, माझे कुटुंब व मित्र परिवाराच्या मदतीने हे समाजहिताचे कार्य मी पार पाडत आहे कोरोना चे पूर्णपणे नायनाट होत नाही तोपर्यंत हे कार्य चालू ठेवणार आहोत…
पुरषोत्तम चोथानी, लासलगांव
….
मोठ्या प्रमाणात मदत कार्य
आमच्या या उपक्रमात जेवणाच्या सुविधेबरोबरच रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटल उपलब्ध करून देणे, ऑक्सीजन सिलेंडर ,औषधे व येणाऱ्या अडचणी यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात मदत कार्य करत आहोत.
विशाल पालवे,लासलगांव