लासलगाव – पुणे येथे नोकरीस असलेल्या लासलगाव येथील योगेश रामबीलास कासट आणि योगेश जगदीश डागा यांनी लासलगाव येथील कोरोना बाधीत रूग्णांची अडचण लक्षात घेवून ५ ऑक्सिजन मेक मशीन व व १० पाण्याचे जार भेट देत गावाप्रती कर्तव्य पार पाडले.
यावेळी हे साहित्य आता लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधित रूग्णासाठी देण्यात येणार असल्याचे लासलगावचे माजी उपसरपंच संतोष डागा यांनी सांगितले. या वेळी सरपंच जयदत्त होळकर , पालकमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंड, वसंत पवार, गुणवंतराव होळकर ,ग्रा.प. सदस्य शेखर होळकर, उपसरपंच अफजलभाई शेख , ग्रा.प.सदस्या अमिता ब्रम्हेचा , पुष्पा आहिरे , गोकुळ पाटील, रवींद्र होळकर, संतोष ब्रम्हेचा, डॉ. विकास चांदर, डॉ. अविनाश पाटील,ललीत दरेकर, मिराण पठाण , विजय जोश ,सचिन होळकर ग्रामविकास अधिकारी. शरद पाटील उपस्थित होते .