लासलगाव – लासलगाव शहरातील किराणा व्यवसायिक कामगार व हमाल यांची किराणा असोसिएशन कोविड १९ अँटीजेन तपासणी करण्यात आली. सुमारे १६७ दुकानदार व कामगारांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सर्व कामगार निगेटिव्ह आल्याची माहिती किराणा असोसिएशनच्यावतीने देण्यात आली.
राज्य सरकारने कोविड १९ या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केलेली आहे मात्र अत्यावश्यक सेवा यामध्ये किराणा व्यावसायिकांचा समावेश असल्याने त्यांचे व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी किराणा व्यावसायिक व त्यांचे कामगार त्यांची कोरोना अँटीजेन बंधनकारक केलेली आहे. लासलगाव किराणा असोसिएशनतर्फे रविवारी बाजार समितीच्या डाळिंब लिलाव सभागृहात तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या तपासणी शिबिराच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ, डॉ विलास कांगणे, डॉ सुजित गुंजाळ, डॉ विकास चांदर यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. शहरातील सर्व किराणा व्यावसायिक त्यांचे दुकानात काम करणारे कामगार व हमाल यांची यावेळी कोरोना अॅन्टीजेन तपासणी करण्यात आली. निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅक्टर व कर्मचाऱ्यांनी हे तपासणी शिबिर पार पडले. या कार्यक्रमास किराणा असोशियनचे अध्यक्ष अशोक डागा, अनिल ब्रम्हेचा, सुरज मालपाणी, समीर आब्बड, अजित जांगडा, कल्पेश दगडे, मनोज होळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.