लासलगाव – निफाड तालुक्यातील पाचोरे बुद्रुक येथील महिलेच्या मारहाणीच्या तक्रारीवरून दाखल खटल्यातुन सबळ पुराव्या अभावी आरोपींची निफाड येथील .अति.मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती एम. एस. कोचर यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
निफाड तालुक्यातील पाचोरे बुद्रुक येथील मंदाबाई पुंडलीक कातकाडे यांचे तक्रारीवरून भाऊसाहेब रामनाथ थोरे रा. पाचोरे बु व इतर ७ जणांविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशनला ८ डिसेंबर २०१३ रोजी गुन्हा नोंदविण्यात होता. फिर्यादी मंदाबाई, तिचे पती पुंडलिक, मुलगा विशाल व सुन विजया यांना सामाईक बांध कोरल्याची कुरापत काढून भाऊसाहेब रामनाथ थोरे व इतर यांनी लथाबुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तक्रार केली होती. सदर खटल्याची गुणवत्तेवर सुनावणी घेण्यात आली. सरकार पक्षातर्फ़े सुमारे ९ साक्षीरांची साक्ष घेण्यात आली. परंतु सरकार पक्षातर्फे दिलेले लेखी व तोंडी पुरावे हे आरोप सिद्ध करणेस पुरेसे नसल्याने, सबळ पुराव्या अभावी आरोपी यांची निफाड येथील अति.मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती एम एस कोचर यांनी सर्व आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात आरोपींतर्फे अॅड. दिपक व्यवहारे यांनी कामकाज बघितले.