लासलगाव – लासलगाव शहरासह निफाड तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली असून येणाऱ्या पुढील काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये या करिता लासलगाव पोलीस प्रशासन तसेच ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
लासलगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरणाऱ्या,तसेच विनाकारण फिरून सोशल डिस्टंसिंग चा भंग करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईची जोरदार मोहीम लासलगाव पोलिसांनी हाती घेतली असून जानेवारी २०२१ पासून ते आज पर्यंत लासलगाव पोलीस ठाण्यात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०० नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्यात २ लाख १ हजार रु दंड वसूल करण्यात आला असून ही कारवाई पुढे सुरूच रहाणार असल्याची माहिती स पो नि राहुल वाघ यांनी दिली आहे
आजही अनेक नागरिक जीवनावश्यक वस्तू तसेच मेडिकल व इतर कारणांमुळे रस्त्यावर फिरताना आढळून येत आहे अशा विनाकारण फिरणाऱ्यावर पोलीस प्रशासनाने कठोर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात १२ ते २३ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे.या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नी आदिनाथ कोठळे,पोलीस कर्मचारी कैलास महाजन,प्रदीप अजगे,नंदकुमार देवढे,योगेश जामदार करत आहे