लासलगाव – येथील दीर्घायू ज्येष्ठ नागरिक संस्था, अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ व स्मित्र संघ विंचूर व लासलगाव पोलीस ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने बुधवारी जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिनाच्या निमित्ताने लासलगाव पोलीस ठाणे येथे सायंकाळी लासलगाव, विंचूर व परिसरातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा संपन्न झाला.
या वेळी लासलगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि राहुल वाघ यांनी ज्येष्ठ नागरिकांवर होणारे अत्याचार, छळ, एकाकी जीवन जगणारे ज्येष्ठ नागरिक या संदर्भात पोलीस मदत व कायदेशीर माहिती व प्रक्रिया याविषयी जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. या वेळी जेष्ठ नागरिक यांना कायदे संदर्भात जेष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरणही यावेळेस करण्यात आले. परिसरातील मोठ्या प्रमाणत ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी जय जनार्दन अनाथ व वृध्द आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचे साल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.
या वेळी अध्यक्ष दीर्घायू ज्येष्ठ नागरिक संस्थेचे पदाधिकारी, सुरेश पवार, सुरेश शिंदे,दिलीप जगताप, शामराव आहेर,भगवान परेराव,रमेश पटेल,सुलेमान मुलाणी, अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ लासलगाव यांचे अध्यक्षा उषाता़ई पवार शोभा माळी,प्रमिला आहेर,विंचूर येथील रामनाथ दरेकर, युसुफ पठाण, भाऊसाहेब संधान, दिलीप साळुंके, शिवाजी दरेकर,आमीन मोमीन,शेख हारून पोलीस कर्मचारी कैलास महाजन, प्रदीप अजगे, आदी उपस्थित होते.