लासलगाव – भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा लासलगाव शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध नोंदवत आपले व्यवहार बंद ठेवले. या वेळी भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोनि राहुल वाघ यांना देण्यात आले. मुस्लिम फाऊंडेशन लासलगाव यांच्या नेतृत्वाखाली समस्त मुस्लिम बांधव यावेळी उपस्थितीत होते. यावेळी सपोनि राहुल वाघ यांनी सदर निवेदन स्वीकारून पुढील कारवाई साठी हे निवेदन वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.