म्युकरमायकोसीसच्या बातमीनंतर कोरोना बरे झालेले १४ रूग्णांनी केली तपासणी बारा जण सामान्य तर दोघांना उपचारासाठी नाशिकला तज्ञांकडे जाण्याचा सल्ला .. नेत्ररोगतज्ञ डाॅ अविदत्त निरगुडे
लासलगाव – म्युकरमायकोसीस या नव्या आजाराचे लासलगावी सहा तर येवला येथे चार रुग्ण तपासणीत आढळले असल्याची महत्वाची बातमी प्रसिद्ध होताच व कोरोना बरे झालेल्या रूग्णांना संभाव्य बाधा होण्याची शक्यता लासलगावचे सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डाॅ अविदत्त निरगुडे यांनी व्यक्त केली होती. याची चांगली जनजागृती होत आज पहिल्याच दिवशी लासलगाव येथे बरे झालेल्या १४ रूग्णांनी या म्युकरमायकोसीस या नव्या आजाराचे संभाव्य शक्यता लक्षात घेत तपासणी करून घेतली त्यापैकी बारा रूग्ण सामान्य तर दोन रूग्ण तपासणीत म्युकरमायकोसीस या नव्या आजाराचे लक्षणाकडे वाटचाल करीत असल्याच तपासणीत बाधीत आढळले या आजार नसलेल्या दहा रूग्णांना घ्यावयाची काळजी बाबत डाॅ अविदत्त निरगुडे यांनी समुपदेशन केले. तर दोन बाधीत रूग्णांना नाशिक येथे म्युकरमायकोसीस या न आजाराचे उपचारासाठी पाठविले आहे.
याबाबत बातमी आल्याने मोठी जनजागृती झाली असुन त्याचाच परीणाम म्हणून आता कोरोना बर झालेले रूग्ण शंका वाटल्यास नाक कान घसा तज्ञ तसेच द॔तचिकित्सक नेत्ररोग तज्ञ यांच्या कडे तपासणीस गेले त वेळीच उपचार घेत संभाव्य धोका कमी होण्याकरिता मदत होईल असे मतही नेत्ररोगतज्ञ डाॅ अविदत्त निरगुडे यांनी पत्रकारांषी बोलतांना सांगीतले.
बातमीने झाली रूग्णांची जनजागृती
गेल्या काही दिवस राज्यभर चर्चा सुरू असलेल्या नव्या म्युकरमायक्वाॅसिस या नवीन रोगाचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिक त्यावर काय उपचार करायचा याची माहिती घेत असतानाच लासलगाव येथे म्युकरमायक्वाॅसिस या नव्या आजाराचे सहा येवला येथे चार रुग्ण तपासणीत दिसून आल्याची माहिती लासलगाव व येवला येथे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. अविदत्त निरगुडे यांनी दिली. सदर रूग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील तज्ञ नेत्ररोग तज्ञ यांचेकडे उपचारासाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे असे बातमीत नमुद झाले आहे.