शनिवार, ऑगस्ट 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगाव येथे संपन्न झाला मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळा; १७ जोडप्यांचे नवे आयुष्य सुरू

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 19, 2022 | 4:05 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221119 WA0019

 

लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाजातील गोर गरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजात एकात्मता वाढीसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा अतिशय महत्वाची आहे. ही परंपरा संस्थेच्या वतीने कायम सुरू ठेवावी असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समिती,मुस्लिम फाऊंडेशन लासलगाव व नाज ए वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाच्या प्रांगणात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी नवविवाहित दाम्पत्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, संस्थेने सामूहिक विवाह सोहळ्याचे उचलेल हे पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे. सामूहिक सोहळ्याने आयोजन ही काळाची गरज आहे. यामुळे विवाहाच्या खर्चातील बचत होऊन हा निधी नवदाम्पत्याला भावी आयुष्यात वाटचालीसाठी उपयोगी पडेल. तसेच गोर गरीब कुटुंबीयांना या सोहळ्यातून अधिक मदत होते असे त्यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, फातिमा बी शेख यांचा आदर्श मुलींनी ठेवावा. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी सावित्रीबाई फुले यांना साथ देऊन महिलांना शिक्षण दिलं. त्यामुळे मुलींनी चांगले शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे असे सांगत समाजातील एकात्मतेाठी तसेच चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी असे सोहळे होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. प्रत्येक विवाहित जोडप्याला संसार उपयोगी साहित्यही यावेळी संस्थेच्या वतीने देण्यात आले.

यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, माजी सरपंच कुसुमताई होळकर, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अकबर शहा, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी सुरासे, ज्येष्ठ नेते अशोक होळकर, उपसरपंच रामनाथ शेजवळ, युवती शहराध्यक्ष सोनिया होळकर, तालुकाध्यक्ष मनीषा वाघ, पांडुरंग राऊत, मंगेश गवळी, बबन शिंदे, समितीचे जिल्हाध्यक्ष सादिक पठाण, नाशिक शहराध्यक्ष हनीफ बशीर,समितीचे समन्वयक तथा लासलगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अफजल शेख, हाजी बिसमिल्ला शहा, डॉ.मुज्जमिल मणियार अल्ताफ शहा, निसार शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Lasalgaon Muslim Community Wedding Ceremony
Nashik

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपची शिंदे गटावर कुरघोडी; राजकीय वातावरण तापले

Next Post

राज्यपाल कोश्यारींचे उचलबांगडी होणार? पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; बघा, काय म्हणाले ते (Video)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Fh7K 6WUAAAFjQy e1668862154136

राज्यपाल कोश्यारींचे उचलबांगडी होणार? पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; बघा, काय म्हणाले ते (Video)

ताज्या बातम्या

facebook insta

सोशल मिडीयावर सक्रिय राहणे एका ६० वर्षीय वृध्देस पडले चांगलेच महाग…फेसबुक मित्राने अशी केली फसवणूक

ऑगस्ट 2, 2025
jail11

९ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या दोन व्यक्तींना अटक…मुंबई विभागाची कारवाई

ऑगस्ट 2, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये अन्न विषबाधा टाळण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती जाहीर…

ऑगस्ट 2, 2025
crime 1111

वाहन चोरीचे सत्र सुरुच…वेगवेगळ्या भागातून पाच दुचाकी चोरीला

ऑगस्ट 2, 2025
unnamed 5

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या एअरोनॉमिक्स २०२५ मोहिमेचा शुभारंभ….स्वच्छ हवा, शून्य कचरा व सशक्त नाशिकच्या दिशेने मोठे पाऊल

ऑगस्ट 2, 2025
IMG 20250801 WA0448 1

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करणार…मुख्यमंत्री

ऑगस्ट 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011