लासलगाव – १९ ते २५ एप्रिल दरम्यान जनता कर्फ्यूला लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर यांनी केलेल्या घोषणेनुसार सुरू झाला. तर व्यापारी वर्गानी दिलेल्या पत्रानुसार व्यवहारात सहभाग न घेतल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे लासलगाव मुख्य बाजार आवारावर व विंचुर उपावारावरील सर्व शेतीमालाचे लिलाव बंद राहीले.
दरम्यान उद्या मंगळवारी लिलाव बंद बाबत लासलगाव येथील बाजार समितीचे संचालक मंडळाची बैठक हो णार आहे. लासलगावी कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असल्याने कोरोना रूग्णांची साखळी तोडण्यासाठी लासलगाव येथे शनिवार रविवार सर्व यावर कडेकोट बंद होते. आज पासून लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर यांनी केलेल्या घोषणेनुसार १९ ते २५ एप्रिल दरम्यान लासलगाव ही जनता कर्फ्यूला सुरुवात झाली असून बंदबाबत कडक अंमलबजावणी सुरू आहे .
लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर ,उपसरपंच अफजलभाई शेख ,ग्रामविकास अधिकारी शरद पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी नागरीकांना लासलगाव परीसरात कोविड – १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने जनता कर्फ्यू काळात दवाखाने आणि मेडिकल सोडून इतर संपुर्ण व्यवसाय बंद ठेऊन लासलगाव मध्ये लॉकडाऊन ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केलेले आहे.
सात दिवसा दरम्यान फक्त आत्यवश्यक सेवाच चालु राहतील. दवाखाने, मेडिकल या व्यतीरीक्त सर्व दुकाने, भाजीपाला हे बंद ठेऊन सहकार्य करावे व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व गावाच्या सुरक्षेतेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे .तसेच या दरम्यान बाहेर कोणीही ररस्त्यावर विनाकारण फिरू नये. असे जाहीर आवाहन कोरोना नियंत्रण समिती व सरपंच जयदत्त होळकर यांनी केले आहे