लासलगाव ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कोटमगाव रोडवर भर दिवसा रहदारीच्या ठिकाणी शेतक-याच्या गाडीची काच फोडत साडेतीन लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. निफाड तालूक्यातील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर तासकर यांनी बँकेतून चार लाख रुपये काढले. त्यातील पन्नास हजार रुपये कृषी औषधे घेण्यासाठी काढत उर्वरीत रक्कम गाडीत ठेऊन ते दुकानात गेले. यावेळी अज्ञात चोरट्याने गाडीची काच फोडून बॅगेत ठेवलेली साडेतीन लाखाची रक्कम लंपास केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून लासलगाव पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहे.