सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
लासलगाव येथून मनमाडला येताना रेल्वे गेट मध्येच लासलगाव-मनमाड बस रेल्वे ट्रॅक वर फेल झाल्याचा प्रकार आज घडला. बस रस्त्यातच फेल झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक जाम झाली होती. तर याच वेळेस येथून न थांबणाऱ्या ट्रेन जात असल्याने रेल्वे प्रशासनाने तातडीने एसटी महामंडळाच्या मदतीने ट्रॅक मध्ये फेल झालेली बस काढण्यासाठी आटोकाठ प्रयत्न केल्या नंतर बस बाहेर काढण्यात यश आले.