लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही अतिशय चुरशीची झाली. या निवडणुकीत उभ्या असलेल्या दोन्ही गटांना समसमान ९ जागा मिळाल्या. त्यामुळे या बाजार समितीत सत्ता स्थापनेसाठी मोठी चुरस निर्माण झाली. अखेर सभापती आणि उपसभापती निवडीत मोठे नाट्य घडले. चक्क दोन्ही गट एकत्र आल्याने हा तिढा सुटला. मात्र हे घडले कसे याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडून आलेल्या दोन्ही गटांना एकत्र करत भुजबळ समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना सभापती पदाची संधी दिली. तर दुसऱ्या गटाचे तरुण उमेदवार गणेश डोमाडे यांना उपसभापती पदाची संधी दिली. यावेळी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
यावेळी जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप, दिलीप खैरे, राजेंद्र डोखळे, सुवर्णाताई जगताप, प्रकाश दायमा, डॉ. श्रीकांत आवारे, सोनिया होळकर, तानाजी आंधळे, ललित दरेकर, प्रवीण कदम, भीमराज काळे, छबुराव जाधव, राजेंद्र बोरगुडे, महेश पठाडे, बाळासाहेब दराडे, रमेश पालवे, ज्ञानेश्वर शेवाळे, पांडुरंग राऊत, मंगेश गवळी, समाधान जेजुरकर, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, नितीन गायकवाड, यांच्यासह सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही अतिशय चुरशीची झाली. या निवडणुकीत उभ्या असलेल्या दोन्ही गटांना समसमान ९ जागा मिळाल्या. त्यामुळे या बाजार समितीत सत्ता स्थापनेसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिष्टाई करत दोनही गटातील उमेदवारांना एकत्र बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोनही गट एकत्र करून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये माजी आमदार वसंत गीते, हेमंत धात्रक व प्रकाश दायमा यांनी महत्वाची भूमिका बजावली.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांना सभापतीपदी संधी देण्यात आली. तर समोरच्या गटातील तरुण उमेदवार गणेश डोमाडे यांना उपसभापती पदाची संधी देण्यात आली. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कारभार होण्यासाठी छगन भुजबळ यांनी दोनही गटांना एकत्र करत विकासाच्या मुद्यावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
यांनी बजावली महत्वाची भूमिका
लासलगाव व येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुयोग्य नियोजन करण्याची सर्वस्वी जबाबदारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपले अत्यंत विश्वासू दिलीप खैरे यांना दिली होती. त्यांनी या दोनही बाजार समितीच्या निवडणुकीत अतिशय चोख नियोजन करून दिलेली जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पार पडली. त्यांच्या या यशस्वी नियोजनाबद्दल छगन भुजबळ यांनी त्यांचे कौतुक केले.
Lasalgaon APMC Election Two groups Join Hand