लासलगाव – लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली निफाडचे गटविकास अधिकारी संदिप कराड, गटविकास अधिकारी व लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, यांच्या उपस्थितीमध्ये कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर बैठक झाली.
लासलगांव येथील कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी २१ एप्रील रोजी वाढत्या कोवीड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लासलगांव येथे जनता कर्फ्युचे केलेल्या आवाहनास लासलगावकरांनी प्रतीसाद दिल्याने रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाण घट झाली. त्यामुळे जनता कर्फ्यु दिनांक २ मे पर्यंत वाढविण्याचा महत्वकांक्षी निर्णय जयदत्त होळकर यांनी घेतला. या कर्फ्युच्या दिवसांत ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व शिक्षकांच्या मदतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेअंतर्गत कुटुंबांचे सर्वेक्षण सुरु करणेकामी पल्स , ऑक्सीमीटर थर्मलगण व सर्वेक्षण माहिती नोंदविण्यासाठी रजिष्टर तसेच हँडग्लोज व मास्क ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. २८ एप्रील ते २ मे पर्यंत आरोग्य पथके तयार करुन ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहीत जयदत्त होळकर यांनी दिली. कोरोनाच्या पहील्या लाटेमध्ये देखील असेच नियोजबद्द कार्यक्रम राबवुन संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
गावाची लोकसंख्येचा विचार करता लासलगांवसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करुन मिळावे अशी विनंती जयदत्त होळकर यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि येवला लासलगांव मतदार संघाचे आमदार छनग भुजबळ आणि सभेस उपस्थीत असलेले जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे केलेली आहे. त्यासाठी येथील सरस्वती विद्यामंदिर उपलब्ध करुन देण्यास तयार असल्याची माहीती होळकर यांनी दिली.
लासलगांव, पिंपळगांव नजिक, टाकळी विंचुर, ब्राम्हणगांव विंचुर, निमगांव वाकडा व परिसरातील गावांतील कोरोना रुग्णांची माहिती घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात आरोग्य अधिकारी व उपस्थीत डॉक्टर यांना जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत लासलगांव, पिंपळगांव नजिक, आणि विंचूर येथील ग्रामविकास अधिकारी यांनी गावपातळीवर येणाऱ्या समस्या यावेळी क्षीरसागर यांच्या पुढे मांडल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य.शिवाजी सुरासे, विंचुरचे सरपंच सचिन दरेकर, लासलगावचे उपसरपंच अफजल शेख,ललित दरेकर, गुणवंत होळकर, रामनाथ शेजवळ, सदस्य, .मंगेश गवळी, संतोष ब्रम्हेचा, निफाड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे, निफाडचे कोरोना संपर्क अधिकारी डॉ.चेतन काळे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.रोहीत शेळके, मंडल अधिकारी विजय आहेर, लासलगांव तलाठी नितीन केदार. तलाठी देविदास लाड, .डॉ.सुजित गुंजाळ, लोटस हाॅस्पिटलचे.डॉ.साईनाथ ढोमसे, डॉ.रोहीत ढोमसे, लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील ,विंचुर ग्रा.वि.अधिकारी जी.टी.खैरणार, पिंपळगाव नजिकचे ग्रा.वि.अ..एस.एम.कदम, ग्रा.वि.अ. पिंपळगांव विंचुर व टाकळी विंचुर, फिरोज मोमीन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी केले.