शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्रावण मास विशेष… जगातील सर्वात मोठे मंदिर….. कल्पनेपेक्षाही अद्भूत… दगडी समूहातील एकमेव शिवमंदिर…

ऑगस्ट 24, 2023 | 5:12 am
in इतर
0
FUFVhUJagAAAhpy

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जगातले सर्वात मोठे मंदिर – भाग ९ 
इंडोनेशियातील प्रम्बानन शिव मंदिर
(क्षेत्रफळ १ ,५२ ,००० स्क्वेअर मीटर)

जगातील सर्वांत मोठी मंदिरं या इंडिया दर्पण च्या विशेष लेखामालेत आज आपण इंडोनेशियातील विख्यात ‘प्रम्बानन शिव मंदिरा’ची माहिती घेणार आहोत. प्रम्बानन शिव मंदिर समुहाचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे एक हजार एकर पेक्षा विस्तीर्ण जागेवर २४४ दगडी मंदिरांचा हा समूह जगात एकमेव आहे. भारता पासून ६८०० किमी वर असलेल्या इंडोनेशियाची राजधानी असलेल्या ‘जावा’ शहरापासून जवळच असलेल्या ‘योग्यकर्ता’ शहरापासून केवळ १७ किमी अंतरावर जगातले हे सर्वांत विशाल मंदिर आहे.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

कधी कधी सत्य हे कल्पनेपेक्षाही अदभुत असू शकते याचा अनुभव इंडोनेशियातील सुप्रसिद्ध प्रम्बानन मंदिराकडे पाहिल्यावर येतो. इंडोनेशियातील हे सर्वांत मोठे आणि अतिशय विशाल असलेल्या मंदिर समुहाला ‘प्रम्बानन शिव मंदिर’ याच नावाने जगभर ओळखतात. या ठिकाणी १००० एकर पेक्षा मोठ्या जागेवर २४४ मंदिरांचे अवशेष आहेत. परंतु त्यापैकी फक्त१०-१२ मंदिरं पूर्वी सारखी पुनर्जीवित करण्यात आली आहेत.त्यामुळे खरं तर जगातले दुसर्या क्रमांकाचे हे मंदिर नवव्या क्रमांकावर आले आहे.

भारता पासून ६८०० किमी वर असलेल्या इंडोनेशियाची राजधानी असलेल्या ‘जावा’ शहरापासून जवळच असलेल्या ‘योग्यकर्ता’ शहरापासून केवळ १७ किमी अंतरावर जगातले हे सर्वांत विशाल मंदिर आहे. स्थानिक जावानिज भाषेत या मंदिराला ‘रोरो जोंग्गारंग’ मंदिर या नावानेही ओळखतात. प्रम्बानन शिव मंदिर समुहाचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे एक हजार एकर पेक्षा विस्तीर्ण जागेवर २४४ दगडी मंदिरांचा हा समूह जगात एकमेव आहे. नवव्या शतकात निर्माण करण्यात आलेल्या या मंदिरातील बहुतांश मंदिरं काळाच्या ओघात कधी धर्मवेड्या मूर्ती भंजकानी तर कधी सोळाव्या शतकांत इंडोनेशियात आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण काळाच्या छातीवर उभं राहून मंदिरांचे हे दगडी अवशेष आजही त्यावेळच्या करागिरांनी निर्माण केलेल्या या दगडी महाकाव्याची महती गात आहेत. या २४४ मंदिरंपैकी दहा-बारा मंदिरांचा जीर्णोद्धार केल्याने ती पुन्हा आपल्या जुन्या वैभवासह दिमाखात उभी राहिली आहेत. भगवान शंकर, भगवान विष्णु आणि ब्रह्मदेव यांची ही तीनच मंदिरं इतकी प्रभावी आहेत की जगभरातील कोट्यवधी पर्यटक केवळ ही मंदिरं पाहण्यासाठी इंडोनेशिया जातात.

इंडोनेशियाचे वैभव असलेल्या अती प्राचीन प्रम्बानन मंदिराची उंची १५५ फूट आहे. या प्रमुख मंदिराची निर्मिती महाराज पिकाटन यांनी नवव्या शतकात (इ.स. ८५० ते ८५६ या कालावधीत) सुरु केली होती.त्यानंतर पुढची शंभर वर्षे संजय राजवंशातील राजा लोकपाल आणि राजा बलितुंग यांनी या मंदिराचा चहूबाजूंनी विस्तार केला. आज देखील जगातली सर्वांत विशाल निर्मिती म्हणून जग या मंदिर समुहाकड़े आश्चर्याने पाहते. या मंदिराचे सुरुवातीचे नाव ‘शिवगृह’ म्हणजे ‘भगवान शिवाचे घर’ असे होते.मंदिरासाठी विशाल भूप्रदेश उपलब्ध व्हावा यासाठी येथून वाहणार्या ‘ओपक’ नावाच्या नदीचा प्रवाह वळविण्यात आला होता.

जवळ जवळ शंभर वर्षे या मंदिर समूहात दर वेळी नवीन मंदिरांची भर पड़त होती. दहाव्या शतकांत ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ‘इस्याना’ राजवंशाने आपली राजधानी मध्य जावा कडून पूर्व जावाकड़े स्थलांतरित केली. राजाश्रय आणि लोकाश्रय नसलेली ही सगळी मंदिरं हळूहळू ज्वालामुखीची राख आणि येथे वाढलेल्या घनदाट जंगलात गडप झाली. नंतरची अनेक शतके अफगान आणि मुघल आक्रमकांनी या मंदिरांचा यथेच्छ विध्वंस केला आणि सोळाव्या शतकांत इंडोनेशियात आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने या विशाल मंदिराचे उरले सुरले अवशेषही जमीनदोस्त केले. त्यानंतर सुमारे दोन शतकं त्यावेळीदेखील जगातील सर्वांत मोठा असलेला हा मंदिर समूह विस्मृतीच्या पडद्यआड गेला.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रज आणि डच लोक इंडोनेशियात आले. मंदिरांचे हे खंडहर पाहून ते आश्चर्यचकित झाले. आसपासच्या जावानिज लोकांनी त्यांना या मंदिरांविषयी सांगितले. डच लोकांनी या मंदिर समुहाचे उत्खनन केले. विशेष म्हणजे डच राजांनी १९१८ मध्ये मुख्य शिव मंदिराचे पुनरनिर्माण सुरु केले. पुन्हा मध्येच दोन महायुद्धे झाली त्यामुळे या मंदिरांचे पुनर्निर्माण थांबले. अशा अनेक मानव निर्मित आणि नैसर्गिक अडथळयांवर मात करीत १९५३ मध्ये मुख्य शिव मंदिराचे पुनर्निर्माण पूर्ण झाले. त्यावेळी इंडोनेशियाचे प्रथम राष्ट्रपति सुकर्णो यांनी या मंदिराचे उद्घाटन केले. यानंतर इ.स.१९७८ पासून १९९३ पर्यंत भगवान विष्णु आणि ब्रह्मदेव यांची विशाल मंदिरं तसेच या तिन्ही देवतांची वाहने असलेल्या नंदी, गरुड आणि हंस यांची मंदिरं ही पुन्हा पूर्वी जशी होती अगदी तशीच बांधण्यात आली. याही मंदिरांचे उद्घाटन राष्ट्रपति सुकर्णो यांनी केले. आजही या मंदिरांचे पुनरनिर्माण कार्य चालूच आहे.

प्रम्बानन मंदिरांची रचना
प्रम्बानन मंदिरं प्रामुख्याने दोन मोठ्या भागांत विभागलेले आहे.यातील सर्वांत मोठा भाग बाहेरचा असून यांत २४० मंदिरं आहेत. या सर्व २४० मंदिरांच्या आतल्या मध्य भागांत तीन मुख्य मंदिरं आणि तीन वाहन मंदिरं आहेत.
या मंदिर समुहाच्या केंद्र स्थानी भगवान शंकरांचे प्रम्बानन हे सर्वांत उंच आणि विशाल मंदिर आहे. त्याच्या उत्तरेला भगवान विष्णुंचे तर दक्षिणेला ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. ही तीन मंदिरं पुर्वाभिमुख आहेत.
याशिवाय भगवान विष्णुच्या मंदिराजवळ लक्ष्मीचे तर ब्रह्मदेवाच्या मंदिरा सरस्वतीचे मंदिर आहे. आज या मंदिरांत लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या मूर्ती नाहीत. जावानिज भाषेत ‘जवळ’ या शब्दाला ‘अपित’ म्हणतात. म्हणून या दोन मंदिरांना अपित मंदिरं म्हणतात.
पेरवाड मंदिरं

मुख्य मंदिरांभवती २२० मंदिरांची रचना एक सारखी आहे. या प्रत्येक मंदिराची उंची ४५ फूट आणि लांबी रुंदी २० बाय २० फूट आहे. प्रत्येक मंदिरांत पूर्वी एक एक देवतेच्या मूर्ती होत्या परंतु आता त्यापैकी जवळ जवळ सर्वच मंदिरांचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. कोरीव काम केलेल्या दगडांच्या राशी पाहून मन विषण्ण झाल्या शिवाय रहात नाही.
प्रम्बानन मंदिरांच्या भिंतीवर रामायण आणि महाभारत काळातील प्रसंग कोरलेले आहेत. शिव मंदिरांत प्रवेश केल्यापासून ही भित्तिचित्र दिसतात.ती प्रदक्षिणा पूर्ण होई पर्यंत पाहता येतात.शिव आणि ब्रह्मा यांच्या मंदिरांच्या भिंतीवर रामायणातील प्रसंग तर विष्णुच्या मंदिरावरील भिंतींवर कृष्णलीला आणि महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत.

‘रोरो जोंग्गरंग’ कथा
या मंदिराला स्थानिक भाषेत ‘रोरो जोंग्गरंग’ नावानेही ओळखतात.मुख्य मंदिरातील दुर्गा मातेच्या मुर्तीची ‘रोरो जोंग्गरंग’ नावाच्या देवीचे पूजन केले जाते. ‘रोरो जोंग्गरंग’ ही येथील राजकुमारी होती. येथील ९९९ देवतांच्या मुर्तीतील १००० वी मूर्ती ‘रोरो जोंग्गरंग’ हिची आहे.त्यामुळेच आजही तिची पूजा केली जाते.
प्रम्बानन मंदिरापर्यंत कसे जावे?
मंदिरापासून १७ किमी. अंतरावर ‘योग्यकर्ता’ हे इंडोनेशियातील मोठे नगर आहे. इंडोनेशियातुन येथे येण्यासाठी अतिशय चांगले रस्ते तयार केलेले आहेत. टैक्सी व बसेस सेवा सतत सुरु असते. दरवर्षी सुमारे एक कोटी पेक्षा अधिक पर्यटक हे मंदिर पहायला येथे येतात. त्यामुळे जगभरातील प्रमुख शहरातून योग्यकर्ता येथे विमान सेवा उपलब्ध आहे.

-विजय गोळेसर मोबा ९४२२७६५२२७
Largest Temple in the World Prambanan Temple by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्री विष्णु पुराण… नहुष पुत्र ययातीची कहाणी… हो, याच विषयावर वि. स. खांडेकरांनी काबंदरी लिहिली…

Next Post

गुजरात आणि चीनमधून आले बोगस वजन काटे… सरकारने काढले हे पत्रक

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
download 98

गुजरात आणि चीनमधून आले बोगस वजन काटे... सरकारने काढले हे पत्रक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011