मुंबई – ८० च्या दशकात प्लेन हायजॅक झालेल्या सत्य घटनेवर आधारित बेल बॅाटम हा चित्रपट १९ ॲागस्ट रोजी सिनेमाघरात रिलीज होणार आहे. आहे. यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून त्याने सिक्रेट एंजटचा रोल साकारला आहे. पण, या चित्रपटात सर्वात जास्त चर्चा आहे अभिनेत्री लारा दत्ताची. तीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. या चित्रपटात वानी कपूर, हुमा कुरेशी, जॅकी भग्नानी यांच्याही भूमिका आहे. रंजित तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाच्या इंदिरा गांधीची भूमिका करतांना लारा दत्त यांनी मेकअप करतांनाचा व्हिडिओ अक्षय कुमारने ट्विट केला आहे. तर लारा दत्ताने त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या हा व्हिडिओ खूपच चर्चेत आहे.
None of this would be possible with your constant support and encouragement!! I could, because you believed I could!! ??? https://t.co/P9GE5NfBMV
— Lara Dutta Bhupathi (@LaraDutta) August 5, 2021