सोमवार, नोव्हेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरती २०२१ : भूकरमापक तथा लिपिक पद परीक्षेची घोषणा

नोव्हेंबर 17, 2022 | 5:31 am
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भूमी अभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमूह (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या पदाची परीक्षा 28, 29 आणि 30 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. 28 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये पुणे विभागाची तर सत्र 2 मध्ये कोकण विभागाची परीक्षा होईल. 29 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये औरंगाबाद विभागाची तर सत्र 2 मध्ये नाशिक आणि अमरावती विभागाची परीक्षा होणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये नागपूर विभागाची परीक्षा होईल, अशी माहिती जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एन.के. सुधांशू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत माहिती विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in यावर उपलब्ध होणार आहे. संबंधित उमेदवारांने संकेतस्थळावरील सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेवून परीक्षा द्यावयाची आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते.

सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) २८ ते ३०/११/२०२२ या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होईल. परीक्षेबाबत संभाव्य वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.

भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता ०९/१२/२०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याकामी दिनांक ०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी व अर्ज स्वीकृतीचे काम करण्यात आलेले होते.

०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची माहिती (DATA) प्राप्त झालेनंतर सदर DATA ची प्राथमिक तपासणी केली असता भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक तथा लिपिक पदाकरीता जाहिरातीत नमूद अर्हता धारण न करणाऱ्या उमेदवारांनी देखील अर्ज सादर केल्याचे दिसून आले. तसेच उमेदवारास कोणत्याही एकाच विभागाकरीता अर्ज सादर करण्याबाबत सूचना असून देखील काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक विभागाकरीता अर्ज सादर केलेले दिसून आले. या कारणास्तव विभागाकडून २८/०२/२०२२ ते १३/०३/२०२२ या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवित दुबार अर्ज भरलेल्या उमेदवारांना कोणत्याही एकाच विभागातील अर्ज कायम करण्याची तसेच अर्हता धारण करत असल्याबाबत प्रमाणपत्रे अपलोड करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.

छाननी अर्ज प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या सूचनांनुसार ज्या उमेदवारांनी दिनांक ९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे तसेच छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या उमेदवारांच पदभरती प्रक्रियेतील परीक्षेस बसण्याकरीता पात्र करण्यात येईल. जे उमेदवार अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड करुन छाननी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, अशा उमेदवारांना पदभरती परीक्षेसाठी अपात्र समजण्यात येईल, अशी सूचना एस एम एस द्वारे तसेच विभागाकडून देण्यात आलेली होती.

Land Record Service Recruitment Exam Declare

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गोपिचंद पाडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा सरकारला घरचा आहेर; एसटी कर्मचाऱ्यांसाठी घेतला हा निर्णय

Next Post

सावधान! मुंबईतील ‘त्या’ ऑटो रिक्षा आणि टॅक्सींचा परवाना निलंबित होणार; परिवहन विभाग आक्रमक

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
auto rikshaw fair e1675523676901

सावधान! मुंबईतील 'त्या' ऑटो रिक्षा आणि टॅक्सींचा परवाना निलंबित होणार; परिवहन विभाग आक्रमक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011