इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
नुकसान भरपाई रक्कम आणि कॅपिटल गेन
ग्राहक राजा जागा हो!
रस्ते, रेल्वे, उद्योग, धरण, कॅनल किंवा विविध कामांसाठी सरकारकडून जमिनींचे संपादन केले जाते. या भरपाईपोटी जमीन मालकांना मोबदला दिला जातो. यातून मिळणारी ही रक्कम कॅपिटल गेन असते का, त्यावर काही कर भरावा लागतो का किंवा विविध प्रकारची फी भरावी लागते का, याबाबत अनेकांना माहिती नाही. याविषयी आपण आता जाणून घेऊया…
कोणत्याही कोर्टातून/आयोगातून/सरकार कडून मिळालेली नुकसान भरपाई ही कॅपिटल गेन या सदरात मोडत नाही. शेतीची जमीन किंवा रहिवाशी जमीन ही भूसंपादन अधिकारी जेव्हा रस्ते बांधणी, धरण बांधणी, कॅनल बांधणी किंवा शहरात काही सोई सुविधा निर्माण करणे साठी सरकार ताब्यात घेते तेव्हा शेतकरी वर्गास तसेच ज्याची रहिवाशी जमीन आहे अशा वर्गास भरपूर रुपये हे नुकसान भरपाई म्हणून मिळतात. आधीच्या फडणवीस सरकारने भूसंपादन व्यवस्थित व्हावे आणि शेतकरी लोकांचे नुकसान होऊ नये म्हणून चारपट रक्कम ही नुकसान भरपाई म्हणून द्यावी असा निर्णय घेतला होता. त्यामुळे लोकांना प्रचंड प्रमाणात नुकसान भरपाई म्हणून पैसे मिळाले.
सदर जास्त प्रमाणात मिळालेली रक्कम ही कित्येक शेतकरी वर्गाने घेतली तेव्हा दलाल लोक तसेच काही सरकारी अधिकारी हे त्यांना फसवत आसतात. मिळालेले पैसे हे नुकसान भरपाई म्हणून मिळालेले असल्यामुळे त्यावर इन्कम टॅक्स भरावा लागत नाही हे त्यांना माहीत नसते. RFCTLARR कायद्या नुसार सदर मिळालेल्या नुकसान भरपाई वर इन्कम टॅक्स, स्टॅम्प ड्युटी किंवा रजिस्ट्रेशन फी द्यावी लागत नाही. कित्येक शेतकरी वर्गास तथा कथित दलाल हे इन्कम टॅक्स, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी चे नावाखाली शेतकरी वर्गाकडून पैसे उकळतात जे बेकायदा आहे.
अशाच प्रकारे ग्राहक कोर्टाकडून काही रक्कम ही नुकसान भरपाई म्हणून मिळते त्यावर पण इन्कम टॅक्स भरावा लागत नाही हे कित्येक लोकांना माहीत नसते. ग्राहक म्हणून आपणास काही त्रास झाला, आपली फसवणूक झाली आणि आपले काही नुकसान झाले तर ग्राहक आयोगात आपण जातो. कित्येक केसेसचे निकालामध्ये ग्राहक आयोगाने ग्राहकाचे बाजूने निकाल दिले आहेत आणि नुकसान भरपाई म्हणून काही लाख/कोटी रुपये हे विरूद्ध पार्टीला देणे साठी आदेश दिले आहेत. जेव्हा लाखो रुपये आपणास मिळतात तेव्हा त्यावर इन्कम टॅक्स द्यावा लागतो का अशी विचारणा बरेच ग्राहक करतात.
*एका बिल्डरचे विरूद्धचे केस मध्ये ग्राहकाला दोन कोटी रुपये एवढी नुकसान भरपाई देणेचा आदेश दिला. त्यात बिल्डरला दिलेले पैसे परत देणे, बिल्डर कडे पैसे दिल्याचे दिवसा पासून १२% दराने व्याज, कोर्ट खर्च पोटी काही रक्कम, मानहानी पोटी काही रक्कम असे सर्व मिळून दोन कोटी रुपये देणेचा आदेश दिला.*
अजून एका केस मधे एक सतर्क ग्राहक श्री राघव त्रिवेदी, जे अनिवासी भारतीय आहेत त्यांनी बिल्डर मेसर्स आदर्श डेव्हलपर आणि इतर यांच्या कडे बंगलोर मध्ये एक फ्लॅट घेणे साठी पैसे दिले होते. परंतु बिल्डर ने रक्कम घेऊन पण कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे घराचा ताबा दिला नव्हता.
त्यामुळे राष्ट्रीय ग्राहक आयोग, नवी दिल्ली येथे बिल्डर विरूद्ध श्री राघव यांनी केस दाखल केली होती. त्यात राष्ट्रीय ग्राहक आयोगाने नुकसान भरपाई म्हणून १,९२,१८,१५७/- रुपये देणे साठी मेसर्स आदर्श डेव्हलपर आणि इतर यांना आदेश दिला होता.
सदर आदेशाप्रमाणे श्री राघव यांना रुपये १९२१८१५७/- मिळाले होते.
सदर रक्कम मिळाल्यावर त्यांनी त्या वर्षाच्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये सदर रक्कम ही राष्ट्रीय ग्राहक आयोग यांनी आदेश दिल्या प्रमाणे नुकसान भरपाई आणि स्वतः भरलेली रक्कम असे दोन्ही आहे.
परंतु इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ने सदर नुकसान भरपाई ची रक्कम ही इतर इन्कम (उत्पन्न) म्हणून पकडली नाही आणि त्यांना कॅपिटल गेन म्हणून इन्कम टॅक्स भरायला सांगितला. परंतु सदर बाबत श्री राघव यांनी इन्कम टॅक्स लवाद कडे अपील केले असता लवादाने आदेश दिले की सदर राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिलेली नुकसान भरपाईची रक्कम ही कॅपिटल गेन म्हणून उत्पन्न म्हणून ग्राह्य धरून केलेली टॅक्स आकारणी बरोबर नाही आणि त्यांना रुपये ३१९५९७०/- एवढी रक्कम रीफंड देणे तसेच रुपये ४२९९१५/- एवढे व्याज देणे हे बरोबर आहे असे नमूद केले. सदर निकाल हा अहमदाबाद येथील इन्कम टॅक्स लवादाने दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ ला दिला आहे
तेव्हा सर्व ग्राहकांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की आपण ग्राहक म्हणून सतर्क राहिले पाहिजे. आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असू की कोणतेही सरकारी डिपार्टमेंट किंवा कितीही मोठी विरोधी पार्टी ज्यात मोठे बिल्डर पण असुध्यात अगदी ज्याचा राजकारणी लोकांशी जास्त संबंध आहेत असे कोणीही असूद्यात, न घाबरता आपण ग्राहक आयोगात केस दाखल केली पाहिजे आणि मिळालेली नुकसान भरपाई ही देखील योग्य कलम खाली इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवली पाहिजे. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आपण आपल्या सी ए शी संपर्क करून आपला टॅक्स वाचवा, कारण कोर्ट नुकसान भरपाई म्हणजे कॅपिटल गेन नाही.
सर्व प्रकारच्या ग्राहक तक्रारी बाबत जागृत व्हा आणि मोफत मार्गदर्शन मिळवा.
आपणास काहीही मदत लागली तर संपर्क साधा.
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
विजय सागर अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: *दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*
अधिक माहितीसाठी
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
,*नागपूर*, श्री विलास ठोसर 7757009977
*कोकण प्रांत* सौ वेदा प्रभूदेसाई 9075674971
*देवगिरी परभणी* श्री विलास मोरे 09881587087
*कोल्हापूर* ऍड.सुप्रिया दळवी, मो.7038887979
*सांगली* श्री.सर्जेराव सूर्यवंशी, मो.9763722243
*सातारा* श्री जयदीप ठुसे, 9767666346
*सोलापूर* श्री.शशिकांत हरिदास, मो.9423536395
*जळगांव* डॉ. अनिल देशमुख, मो.7588011327
*नगर* श्री. अतुल कुऱ्हाडे, मो.9420642021
*नाशिक* श्री. तुळशीराम सांळुके, मो. 9422259089
श्री. रविंद्र अमृतकर, मो. 8412995454
*धुळे* श्री. हरीश जाधव, मो. 7798439555
*नंदुरबार* श्रीम.वदंना तोरवणे, मो .9156972786
Land Acquisition Compensation Amount Capital Gain by Vijay Sagar