नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा )- ‘एमआयटी, पुणे’ शिक्षणसंस्थासमुहाच्या ‘एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत ‘एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसदे’ची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक जिल्हयातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. ललिताताई बिरारी यांची या सरपंच संसदेचे ‘महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा महिला संघटक’ या पदावर सन्मानपूर्वक नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या महाराष्ट्र राज्यातील पदाधिका-यांचे दोन दिवसीय अधिवेशन व नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र वितरण कार्यकम एमआयटीच्या ‘श्रीसंत ज्ञानेश्वर सभागृहात १८ ते १९ नोव्हेंबर २०२२या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय ‘आरोग्य व कुटुंब कल्याण’ विभागाच्या राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार हया उदघाटक व प्रमुख अतिथी होत्या. ‘एमआयटी, पुणे’ शिक्षणसंस्थासमुहाचे कार्यकारी अध्यक्ष, ‘एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट’ चे प्रणेते श्री. राहुल कराड अध्यक्षस्थानी होते. ना डॉ भारतीताई पवार यांच्या हस्ते सौ. ललिताताई बिरारी यांना नियक्तीपत्र आणि ओळखपत्र देवून ही नियुक्ती सन्मानपूर्वक घोषीत करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे ‘वन’ विभागाचे मंत्री व ज्येष्ठ नेते श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी यावेळी आभासी पध्दतीने मार्गदर्शन केले.
प्रमुख संयोजक व सरपंच संसदेचे राष्ट्रीय समन्वयक श्री. योगेश पाटील, सहसमन्वयक श्री. प्रकाशराव महाले, राज्य कार्यवाह श्री. व्यंकटेश जोशी, राज्य संघटक डॉ. नामदेव गुंजाळ, ग्रामविकासतज्ञ समिती समन्वयक श्री. बाजीराव खैरनार, जिल्हा परिषद महिला सदस्य समिती समन्वयक सौ. सरिताताई गाखरे व ‘एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट’ चे संचालक डॉ. गिरीसन हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते
देशाच्या पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे अराजकीय स्वरूपात संघटन करणे, त्यांचे सर्वांगीण प्रबोधन करणे आणि त्यांना ग्रामविकासाची प्रक्रिया यशस्वीपणे राबवता यावी यासाठी सहाय्यभूत होतील असे विविध उपकम अभ्यासपूर्वक राबवणे हे ‘एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख उदिदष्ट आहे. ‘अभिनव फार्मर्स क्लब’चे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बोडके, ‘जेएसडब्ल्यू स्टील कंपनी’च्या सी. एस. आर. विभागाचे प्रमुख श्री. अनिल दधीच व एमआयटीच्या रूरल इमर्शन प्रोगामच्या समन्वयक डॉ. निलम पंडीत यांनी या अधिवेशनात पदाधिका-यांना मार्गदर्शन केले.
देशाच्या पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे अराजकीय स्वरूपात संघटन करणे, त्यांचे सर्वांगीण प्रबोधन करणे आणि त्यांना ग्रामविकासाची प्रक्रिया यशस्वीपणे राबवता यावी यासाठी सहाय्यभूत होतील असे विविध उपकम अभ्यासपूर्वक राबवणे हे ‘एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख उदिदष्ट आहे. ‘एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसदे’चे विविध उपकम महाराष्ट्र राज्याच्या ३४ ग्रामीण व ०२ शहरी जिल्हयात यशस्वीपणे राबवता यावेत यासाठी या एकुण ३६ जिल्हयातून सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान असणा-या सहका-यांचे मोठे नेटवर्क संघटित करण्यात आले आहे. निवड करण्यात आलेल्या सहका-यांना या अधिवेशनात प्रमुख अतिथींच्या हस्ते नियुक्तीपत्र व ओळखपत्र वितरीत करण्यात आली. सरपंच संसदेच्या नाशिक विभाग महिला समन्वयक सौ. रोहिणीताई नायडू यांनी या नियुक्तीबददल सौ ललिताताई बिरारी यांचे अभिनंदन केले आहे.