मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लालबाग गणेशगल्लीतील ‘मुंबईचा राजा’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दर्शन घेतले व महाराष्ट्राच्या भरभराटीसाठी प्रार्थना केली.
देशभरात पुढचे दहा दिवस गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. घरोघरी गणराय विराजमान झाले आहेत. सार्वजनिक मंडळाचे बाप्पाही विराजमान झाले असून दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळाला राजकीय नेतेही दर्शन चुकवत नाही. आज उध्दव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी दर्शन घेतले.
जोशी यांच्या घरच्या गणारायचे दर्शन
आज शिवसेना नेते स्व. मनोहर जोशी ह्यांच्या घरच्या गणरायाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी दर्शन घेतले.