मुंबई – लालबागच्या राजाच्या लाखो भक्तांसाठी अत्यंत मोठी बातमी आहे. यंदा आपल्या लाडक्या राजाचे दर्शन भाविकांना घडणार आहे. यासंदर्भात लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाने निर्णय घेतला आहे. यंदा लालबागचा राजा विराजमान होणार आहे. गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे लालबागचा राजा विराजमान न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. मात्र, यंदा राजाला विराजमान केले जाणार आहे. त्यामुळे यंदा राजाच्या दर्शनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांना यंदा नियोजन करण्यास हरकत नाही. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन बाप्पाला विराजमान केले जाईल आणि दर्शनासाठी भाविक येतील तेव्हाही सर्व नियम पाळले जातील, असे मंडळाने निश्चित केले आहे. राज्य सरकारने गणेशोत्सव आणि मूर्ती स्थापनेबाबत जे नियम घालून दिले आहेत त्याचे तंतोतंत पालन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
https://twitter.com/ANI/status/1421692851071508480