शुक्रवार, ऑक्टोबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लालबागच्या राजाचा प्रसाद आता पेटीएमवरून करा ऑर्डर; लाइव्ह दर्शनासह मंडळाला दान देण्याचीही सुविधा

सप्टेंबर 1, 2022 | 4:32 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Lalbagcha raja

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी, तसेच क्यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी कंपनी ब्रॅण्ड पेटीएमला दोन वर्षांच्या अंतरानंतर परतत असलेला मुंबईचा सर्वात जुना व सर्वात लोकप्रिय लालबागचा राजा उत्सवासाठी विशेष अधिकार देण्यात आले आहेत. कंपनी आपल्या अॅपवर बाप्पाचे लाइव्ह दर्शन प्रसारित करणारे एकमेव व्यासपीठ असेल. तसेच बाप्पाचा प्रसाद आणि मंडळाला दान देण्याची सुविधाही एका क्लिकवर उपलब्ध असेल.

पेटीएम सुपर अॅपसह देशातून कुठूनही ड्रायफ्रूट प्रसाद ऑर्डर करता येऊ शकतो आणि हा प्रसाद २ ते ५ दिवसांमध्ये डिलिव्हर करण्यात येईल. हा प्रसाद २५० ग्रॅमसाठी ४०० रूपये स्वरूपात ऑर्डर करता येऊ शकातो. ऑर्डर करण्यासाठी पेटीएम अॅप होम पेजवरील गणेश उत्सव आयकॉनवर क्लिक करावे.

कंपनीने मंडळाला भेट देणाऱ्या नवीन वापरकर्त्यांसाठी आकर्षक ऑफर्स लॉन्च केल्या आहेत. पेटीएम अॅप डाऊनलोड केल्यानंतर नवीन वापरकर्ते लालबागचा राजा मंडळामध्ये असलेले क्यूआर कोड स्कॅन करत ५१ रूपये दान करू शकतात, तसेच त्यांना याच रक्कमेच्या कॅशबॅकसोबत प्रसादाचे लाडू मिळतील. मंडळाला भेट देऊ न शकणारे नवीन वापरकर्ते ऑनलाइन प्रसाद ऑर्डर करू शकतात आणि त्यांना देखील ५१ रूपयांची कॅशबॅक मिळेल. पेटीएम अॅपवर दिवसातील सर्वोच्‍च दान करणाऱ्या वापरकर्त्याला स्पेशल व्हीआयपी दर्शनासाठी ‘कपल एण्ट्री’ पास मिळतील.

पेटीएम प्रवक्ता म्हणाले, ‘’क्यूआर व डिजिटल पेमेंट्सचे अग्रगण्य म्हणून आम्ही महाराष्ट्रात आर्थिक समावेशनाला चालना देण्याप्रती कटिबद्ध आहोत. लालबागचा राजा उत्सव कमिटीसोबतच्या आमच्या सहयोगाचा महाराष्ट्रातील लोकांसोबत सखोल सहभाग निर्माण करण्याचा आणि सणासुदीचा काळ व आगामी नववर्षासाठी नवीन शुभारंभांची सुरूवात करण्याचा मनसुबा आहे.’’

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी म्हणाले, ‘’आम्हाला आनंद होत आहे की, दोन वर्षांनंतर गणेशभक्त मंडळाला भेट देऊ शकतील आणि आम्हाला १.२ कोटींहून अधिक गणेशभक्त भेट देण्याची अपेक्षा आहे. अधिकाधिक गणेशभक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी पेटीएम अॅपच्या माध्यमातून लाइव्ह दर्शन मोठे वरदान ठरेल. देशभरातील गणेशभक्त अॅपवर दान करू शकतात आणि हे दान सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यात येईल.’’

Lalbag Raja Prasad Live Darshan Donation Prasad Paytm
Facility Mobile App

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नोकरीवरुन काढल्याने ७ कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गेटवरच विषप्राशन केले

Next Post

या जिल्ह्याला पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

crime112
क्राईम डायरी

बसस्थानक परिसरातून चोरी झालेल्या साडे तीन लाखाच्या आठ मोटारसायकली पोलिसांनी केल्या हस्तगत…

ऑक्टोबर 3, 2025
MOBILE
क्राईम डायरी

ऑनलाईन पैसे अदा केल्याचा फेक मॅसेज दाखवून पोबारा…दुकानादारांना घातला गंडा

ऑक्टोबर 3, 2025
G2P2FzVW4AAIZis 1920x1490 1
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला दिली भेट

ऑक्टोबर 3, 2025
G2QzQ01XEAAjeQw 1024x682 1
मुख्य बातमी

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात

ऑक्टोबर 3, 2025
Government of India logo
महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी…

ऑक्टोबर 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी,जाणून घ्या, शुक्रवार, ३ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 3, 2025
CM
मुख्य बातमी

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा….

ऑक्टोबर 2, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारसपात्र ४८५ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

ऑक्टोबर 2, 2025
Next Post
rainfall alert e1699421697419

या जिल्ह्याला पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011