मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत लालबाग येथील गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली.
सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री रवींद्र चव्हाण, अमित साटम, श्री. नड्डा यांच्या कुटुंबातील सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.