इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नुकताच प्रदर्शित झालेला अभिनेता अमीर खानचा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ हा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. चित्रपटाच्या आगमनापूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. तर या चित्रपटाविरोधात सोशल मीडियावरदेखील बॉयकॉट आंदोलन छेडण्यात आले होते. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपट सपशेल आपटला आहे. यानंतर अभिनेता आणि चित्रपटाचा निर्माता असलेला आमीर खान याच्या पुढे संकटाची मालिका उभी राहिली आहे. या चित्रपटाच्या फ्लॉप होण्याचे खापर आमीर खानच्या माथ्यावर फोडण्यात येत आहे.
आमीर खान आणि करिना कपूर यांच्या ‘लाल सिंह चड्ढा’ प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चा आणि क्रेझ दिसली. मात्र प्रत्यक्ष चित्रपट रिलीज झाल्यानंतर फ्लॉप ठरला. आमीर आणि करिनाचे चाहते अनेक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, हे सर्व असूनही चित्रपट फ्लॉप ठरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. चित्रपट फ्लॉप होण्यासाठी आमीर खानला जबाबदार धरले जात आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटले आहे की आमिर खानमुळेच चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन खूपच खराब झाले आणि चित्रपट फ्लॉप ठरला.
‘बॉलीवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने, वायकॉम १८ ने लाल सिंह चड्ढाच्या फ्लॉपचे खापर पूर्णपणे आमिर खानवर फोडले आहे. चित्रपट फ्लॉप फक्त आणि फक्त आमीर खानमुळे झाला आहे, असे म्हटले आहे. आमिरने चित्रपटात चांगले काम न केल्याचा आरोप आता होतो आहे. आमिरने त्यांच्याशी चर्चा न करता अनेक निर्णय घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ची निर्मिती वायकॉम १८ आणि आमीर खानच्या प्रोडक्शन हाऊसने मिळून केली आहे. मात्र, प्रमोशनशी संबंधित सर्व निर्णय आमिर खानने घेतले आहेत. वायकॉम १८ या निर्णयांमध्ये सहभागी नव्हते असे देखील आता सांगितले जात आहे.
या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, वायकॉम १८ ला शेवटच्या क्षणापर्यंत माहीत नव्हते की आमिर खान ‘कॉफी विथ करण’मध्ये जाणार आहे. यासोबतच आमिरने यादरम्यान असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले ज्याची कल्पना त्याने वायकॉम १८ अजिबात दिली नव्हते. त्यामुळे या सर्वांचे खापर आता अमीर खानच्या माथ्यावर फोडले जात आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर आमीरसमोर संकटांची मालिका सुरू झाली आहे, ती काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही.
Lal Singh Chaddha Movie Producer Allegation Actor Aamir Khan
Bollywood Entertainment Flop Failure