पिंपळगाव बसवंत – दिल्ली येथील साहित्य अकादमी आणि कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पिंपळगाव बसवंत ज्येष्ठ कवि लक्ष्मण महाडिक यांची निवड झाली आहे .ग्रामालोक साहित्य विषयक कार्यक्रम असून या कार्यक्रमात मराठी आणि अहिराणी कवितांचा कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमासाठी लक्ष्मण महाडिक यांच्यासह देविदास चौधरी, डॉ. एस. के. पाटील व शैलेश चव्हाण हे कवी सहभागी होणार आहेत. लक्ष्मण महाडिक आणि देविदास चौधरी मराठी कविता सादर करतील डॉ. एस. के. पाटील व शैलेश चव्हाण हे अहिराणी कविता सादर करणार आहेत. देवळा येथील महाविद्यालयाच्या कर्मवीर रामरावजी आहेर सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर हे असून आयोजक ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा.डॉ. एकनाथ पगार आहेत.