नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील शेतकरी आंदोलनात भरधाव जीपने शेतकऱ्यांना चिरडल्याची अमानवी घटना घडली. या घटनेमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. याच घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. मन विचलित करणारी दृष्ये यात दिसत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या वाहनाने जाणून बुजून हा अपघात घडविल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या गंभीर अपघातात ८ शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. सोशल मिडियात हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून त्याची दखल घेत जीप व एसयुव्ही चालकासह संबंधित दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. उत्तर प्रदेश सरकार व केंद्र सरकार या दोन्ही सरकारांना सध्या जोरदार लक्ष्य केले जात आहे. एवढा गंभीर आणि क्रूर प्रकार घडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गप्प कसे, असा सवाल काँग्रेससह अनेक पक्षांनी विचारला आहे. आता या व्हायरल व्हिडिओमुळे संबंधितांवर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बघा या दुर्घटनेचा व्हायरल व्हिडिओ
https://twitter.com/INCIndia/status/1445087199653888009?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1445087199653888009%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Findia%2Flakhimpur-kheri-viral-video-appears-to-show-farmers-being-run-over-by-suv-in-up-district-1006331