इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिकिनी परिधान करुन इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करणाऱ्या प्राध्यापिकेला ही बाब चांगलीच महागात पडली आहे. कोलकाता येथील सेंट झेवियर्स युनिव्हर्सिटीमध्ये या प्रकरणाने आता चांगलाच जोर पकडला आहे. सोशल मीडियावर अश्लील छायाचित्रे पोस्ट केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी महिलेवर केला. आता त्या महिला प्राध्यापिकेविरोधात विद्यापीठ प्रशासनाने तब्बल ९९ कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापले आहे.
ही घटना कोलकाता येथील सेंट झेवियर्स विद्यापीठातील आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, राजीनाम्यासाठी कॉलेज प्रशासनाने दबाव आणल्याचा आरोप महिला प्राध्यापिकेने केला. मुलाच्या पालकांच्या तक्रारीनंतर तिला कॉलेज सोडण्यास भाग पाडण्यात आले, असा दावा तिने केला आहे. बिकिनी परिधान केलेल्या महिलेची ही पोस्ट गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याची आहे.
या बदनामीच्या नोटिशीच्या विरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे या महिला प्राध्यापिकेने म्हटले आहे. त्याच वेळी, या प्रकरणी विद्यापीठाच्या अधिका-यांनी स्पष्टीकरणासाठी महिला प्राध्यापिकेला बोलवले होते. त्यावेळी ती म्हणाली होती की, विद्यापीठात रुजू होण्याच्या दोन महिन्यांपूर्वी तिने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोणताही विद्यार्थी तिचे हे फोटो पाहू शकत नाही. कारण, तोपर्यंत हे सर्व फोटो आपोआप ट्रॅशमध्ये जातात.
मीडिया रिपोर्टनुसार, महिला प्रोफेसरने सांगितले होते की, प्रथम वर्षाच्या पदवीला असलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांनी आपल्या मुलाला विद्यापीठातील प्राध्यापकाचे अश्लील फोटो पाहताना पकडले. या पत्राच्या आधारे विद्यापीठ प्रशासनाने आपल्यावर कारवाई केल्याचे प्राधअयापिकेने सांगितले. सध्या तरी या प्रकरणाला वेग आला आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीसाठी तब्बल ९९ कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Lady Professor Bikini Photo Instagram University Notice
Kolkata St Xavier