असा आहे नाशिक जिल्हा लाड शाखीय वाणी समाज संघटनाचा एकमुखी ठराव आणि निश्चय
सन्माननीय
समाज जन, माय, बाप आणि बंधू, भगिनी,
सस्नेह नमस्कार,
सादर प्रणाम,
आणि दंडवत !
आजचा संवाद केवळ आपण, आपले निकट वर्तिय , आपले आप्तेष्ट, आपले हितचिंतक आणि स्नेही करोनाच्या दुसऱ्या लाटेतून सही सलामत सुटावे यासाठीच !
करोना च्या ४०० पेक्षा अधिक दिवसाच्या साथीने आपल्याला हे नक्की ज्ञात आहे की त्याने
किती व्यक्ती, किती कुटुंब, किती परिवार उध्वस्त केले..
असे असूनही काही समाज बांधव आजही सुख – दु:खाचे प्रसंगी नातलग,परिचित यांना भावनिक साद घालून निमंत्रण देतात. काही लोक कारणे देऊन जाण्याचे टाळतात तर काही ‘तोंडावर तोंड पडते ‘ हा प्रचलित शब्द वापरून हजेरी लावतात .
आणि तेथेच या करोना ला आपण सादर निमंत्रण देतो.
होय, शुभ कार्य असो की दू: खद घटना, आजही साखरपुडा, शिष्टाचार, लग्न, अंत्यविधी, द्वार दर्शन ,दहावे, बारावे, तेरावे , पेशंट ला भेटायला जाणे यावर गांभीर्याने विचार करत नाही.
लक्षणे नसलेला, लक्षणे असलेला, बाधित किंवा बरा झालेला रुग्ण आपल्याला केव्हा बाधित करतो कळतच नाही.
मग वेळ निघून गेल्यावर केलेला पश्र्चाताप हा व्यर्थच !
मग एकीकडे आजाराची लक्षणे तर दुसरीकडे घरच्यांची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नाराजी.
यातूनच किरकोळ लक्षणे असलेला आजार ,आधी घरीच औषधोचार, मग दवाखाना, हॉस्पिटल, मग ऑक्सिजन, नंतर व्हेंटिलेटर आणि दुर्दैवाने चार लोकांचा खांदा ही न मिळता, थेट अमरधाम !
होय, ही सत्य परिस्थिती तर आहेच परंतु कटू सत्यही !
म्हणूनच
*नाशिक जिल्ह्यातील समाज बांधवांनी एकमुखाने ठराव रुपी निश्चय केला आहे*
की,
*१)* माझ्या घरच्या, कुटुंबातील, परिवारातील ,गावातील कोणत्याही सुख वा दुःखाच्या प्रसंगी घरातील सदस्य व्यतिरिक्त कुणालाही निमंत्रित करणार नाही, कुणी बोलावले तरी जाणार नाही.
*२)* शक्य तोवर परिवारातील शुभ कार्ये, दुःखद प्रसंगातील कोणतेही विधी (अस्थी विसर्जन, दहावा, तेरावा सह) सद्य परिस्थितीत न करता काही महिने लांबणीवर टाकेल.
*३)* अत्यावश्यक प्रसंगी असे विधी किंवा कार्य करावे लागल्यास केवळ घरातील सदस्यासह पार पाडण्याचा संकल्प करीत आहोत.
वरील संदेश खरंच कटू असला, अमलात आणणेस कठीण वाटत असला तरी अमलात आणणे शिवाय पर्याय नाही. अन्यथा हा करोना कहर थांबणारच नाही.
आपल्या १००% सहकार्याची आणि अंमल बजावणी ची अपेक्षा.
विनीत
नाशिक जिल्हा लाड शाखीय वाणी समाज संघटन वतीने
राजेश कोठावदे, सचिन बागड, विलास शिरोरे, निलेश कोतकर आणि पदाधिकारी