नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विवाह संस्कृती परिवाराचे सहावे उपवधु-वर संमेलन शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी सुदर्शन लॉन्स, इंदिरा नगर, नाशिक येथे आयोजित केले आहे. सदर परीचय संमेलनात साधारण 110 च्या वर विवाह इच्छुक तरुण-तरुणी उमेदवार उपस्थित राहणार असल्याबद्दलची माहिती विवाह संस्कृती परिवाराच्या संस्थापिका सौ रेखा कोतकर यांनी दिली. या संमेलनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उपवधु-वर यांना भेटण्याचा योग येणार आहे. समाजातील विवाह इच्छुक उमेदवारांनी या संमेलनाचा लाभ घेण्याचे आणि पूर्व नोंदणी करण्याचे आवाहन सौ रेखा कोतकर व विवाह संस्कृती परिवारातर्फे केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
सौ.रेखा नरेंद्र कोतकर 8600381879
श्री अतुल वाणी 9373907487
सौ.सुनिता बाविस्कर 9881812239
Ladshakhiy Wani Vadhu Var Parichay Sammelan
Nashik Wedding Social