नाशिक – नाशिक लाडशाखीय वाणी समाज मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी प्रा. विनोद दशपुते यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा खुटवडनगर येथील माहेरघर मंगल कार्यालयात झाली. त्यात ही निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. यात मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
मंडळाची नवी कार्यकारिणी अशी
अध्यक्ष – प्रा. विनोद निंबा दशपुते
उपाध्यक्ष – श्री गिरीश मालपुरे, श्री निलेश कोतकर
सरचिटणीस – श्री नितीन दहीवेलकर
चिटणीस – श्री प्रशांत सोनजे
खजिनदार – श्री विजय मेखे
सह खजिनदार – श्री उमाकांत वाकलकर








